Imran Khan & Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

जो बायडन यांच्या लिस्टमध्ये इम्रान खान वेटिंगवरच

परंतु त्यांनी अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना फोन केलेला नाही.

दैनिक गोमन्तक

जो बायडन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारुन सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. परंतु त्यांनी अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना फोन केलेला नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये (Pakistan) खूप निराशा आहे. बायडन यांच्या फोनची वाट पाहत बसलेल्या इम्रान सरकारची व्यथा शेजारील देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ (Moeed Yusuf) यांच्या वक्तव्यांमधून दिसून येते. पाकिस्तानी एनएसएने म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना फोन न करणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. विशेष म्हणजे बायडन यांनी भारतासह अनेक देशांच्या प्रमुखांशी फोनवरुन संवाद साधला आहे.

इस्लामाबादशी (Islamabad) संबंध सुधारण्यासाठी वॉशिंग्टनकडून (Washington) कमी प्रयत्न होत असल्यामुळे मला आश्चर्य वाटत आहे असे मोईद युसुफ म्हणाले. वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाला दिलेल्या मुलाखतीत युसूफ यांनी सांगितले की, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इतक्या महत्त्वाच्या देशाच्या पंतप्रधानांशी संवाद साधलेला नाही, अमेरिका स्वतः स सांगतो की हे प्रकरण एक मेक अँड ब्रेक बाब आहे. आम्हाला अमेरिकेचे इशारे समजून घेण्यात अडचण येत आहे. ते पुढे म्हणाले, आम्हाला प्रत्येक वेळी फोन केला जाईल असे सांगितले जाते. ही तांत्रिक समस्या आहे किंवा अजून काहीतरी. खरे सांगायचे तर आता लोकांचा विश्वास कमी झाला आहे.

योग्य वेळी बायडन बोलतील: अधिकारी

अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानची प्रगती थांबवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानशी चर्चा केली आहे. परंतु बायडन यांनी अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी या विषयावर बोललेले नाहीत. वॉशिंग्टनच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करताना युसुफ म्हणाला, "जर सुरक्षा संबंध सवलत असेल, फोन कॉल ही सवलत असेल तर पाकिस्तानला पर्याय आहे." त्याचवेळी, पाकिस्तानी NSA च्या वक्तव्यावर टिप्पणी करताना बायडन प्रशासनाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आतापर्यंत अनेक जागतिक नेते आहेत ज्यांच्याशी बायडन बोलले नाहीत. योग्य वेळ आल्यावर इम्रान खानशी संवाद साधतील.

मोईद युसूफ अमेरिकेच्या दौऱ्यावर

अफगाण समस्येवर चर्चा करण्यासाठी मोईद युसूफ वॉशिंग्टन डीसीमध्ये आहेत. ते पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर 90 टक्के कुंपण घातले आहे. तालिबानी हिंसाचारापासून वाचण्यासाठी लाखो अफगाण शरणार्थी पाकिस्तानात येऊ शकतात अशी भीती पाकिस्तानला आहे. यामुळेच त्याला अमेरिकेबरोबर अफगाण समस्येवर चर्चा करायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT