पाकिस्तान कंगाल, PM इम्रान खान यांचे घरही देणार भाड्याने

पाकिस्तान (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटातून(Financial crisis in Pakistan) जात असलेले पाहायला मिळत आहे.
Financial crisis in Pakistan, PM Imran Khan's house will also be rented out
Financial crisis in Pakistan, PM Imran Khan's house will also be rented outDainik Gomantak

पाकिस्तान (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटातून(Financial crisis in Pakistan) जात असलेले पाहायला मिळत आहे. पाकिस्तान मध्ये इतकी आर्थिक चणचण भासत आहे की, पाकिस्तानने आता पंतप्रधानांचे(Pakistan Prime Minister) सरकारी निवासस्थानच रिअल इस्टेट क्षेत्रात भाड्याने देण्याची घोषणा केली आहे. तर सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) ने ऑगस्ट 2019 मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे विद्यापीठात रूपांतर करण्याची घोषणा केली होती असेही एका वृत्तवाहिनेने सांगितले आहे. पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी ते निवासस्थान रिकामे केले असून आता तिथले काही नियम बदलण्यात आले आहेत. तसेच, सरकारी मालमत्तेच्या उत्पन्नासाठी ही मालमत्ता भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Financial crisis in Pakistan, PM Imran Khan's house will also be rented out)

या अगोदर पाकिस्तनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सांगितले होते की, पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थानाचे शैक्षणिक संस्थेत रूपांतर केले जाईल. परंतु स्थानिक माध्यमांच्या सूत्रांनुसार, इस्लामाबादच्या रेड झोन कॉम्प्लेक्समध्ये असलेली ही मालमत्ता आता सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, शैक्षणिक आणि इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने दिली जाईल. हे काम करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यास सांगितले आहे. यातून केंद्रीय मंत्रिमंडळ पीएम हाऊसमधून महसूल गोळा करण्याच्या अधिक मार्गांचा विचार करणार आहे .

Financial crisis in Pakistan, PM Imran Khan's house will also be rented out
अफगाणिस्तानातील शांततेचा सर्वात मोठा लाभार्थी 'पाकिस्तान'

2019 मध्ये, तत्कालीन शिक्षण मंत्री शफकत मेहमूद यांनी सांगितले होते की पाकिस्तानच्या पंतप्रधान निवासस्थानाच्या देखभालीची किंमत जवळपास 470 दशलक्ष रुपये आहे, म्हणून इम्रान खान यांनी सरकारी बंगला रिकामा करण्याचा निर्णय घेतला होता आणि हे घर उच्चस्तरीय शैक्षणिक संस्थेत रूपांतरित करण्याचे आदेश दिले होते . लाहोरमधील गव्हर्नर हाऊसचे संग्रहालय आणि कलादालनात रुपांतर केले जाईल, तर मुरी येथील पंजाब हाऊस एक पर्यटन परिसर म्हणून आणि कराची येथील गव्हर्नर हाऊस देखील संग्रहालय म्हणून वापरले जाईल, अशी माहिती महमूद यांनी त्यावेळी दिली होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पंतप्रधान झाल्यावरच त्यांनी कबूल केले होते की, पाकिस्तान सरकारकडे लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसा नाही, तर देशातील काही लोक वसाहतवादी पद्धतीने जगत आहेत.

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी अर्थव्यवस्था एका वाईट टप्प्यातून जात आहे हे सर्वांना माहीत आहे. तेथे भांडवली गुंतवणुकीच्या अभावामुळे महागाई खूप वाढते आहे तसेच चालू आर्थिक वर्षात व्यापारी तूट रुंदावली आहे, कारण निर्यात कमी झाली आहे आणि आयात वाढली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली असून मे महिन्यात देशातील चलनवाढीचा दर 10.9 टक्क्यांच्या शिखरावर होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com