Meta Muse Image AI Tool privacy update for Facebook and Instagram users Dainik Gomantak
ग्लोबल

Meta Muse Image AI Tool: युजर्सच्या परवानगीविना फोटोंचा वापर! मेटाच्या नव्या एआय इमेज टूलने उडवली खळबळ; 'असे' सुरक्षित करा तुमचे अकाऊंट

Meta Muse Image AI Tool Privacy Settings: या टूलमधील सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे, कोणताही युजर्स कोणत्याही पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटला मेटा एआय प्रॉम्प्टमध्ये टॅग करु शकतो.

Manish Jadhav

Meta Muse Image AI Tool Privacy Settings: फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी 'मेटा'ने या आठवड्यात एक नवीन एआय इमेज जनरेशन टूल लाँच केले, मात्र या टूलसोबत आलेल्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक युजर्स चक्रावून गेले आहेत. मेटाच्या 'सुपरइंटेलिजन्स लॅब्स'ने 'म्युझ इमेज' नावाचे हे पहिले इन-हाउस एआय मॉडेल विकसित केले. हे टूल सध्या मेटा एआय अ‍ॅप, इंस्टाग्राम स्टोरीज आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सवर लाइव्ह करण्यात आले असून, लवकरच ते फेसबुक आणि मेसेंजरवरही उपलब्ध केले जाईल. या टूलच्या मदतीने युजर्स केवळ एका कमांडवर हुबेहूब इमेज तयार करु शकतात.

जुन्या एआय टूल्सना न जमणाऱ्या गोष्टी, जसे की एकाधिक फोटोंचे एकत्रिकरण, इमेजमधील ठराविक भाग एडिट करणे आणि थेट काम करणारे क्यूआर कोड तयार करणे, या टूलने सहज शक्य झाले.

मात्र, या टूलमधील सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे, कोणताही युजर्स कोणत्याही पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटला मेटा एआय प्रॉम्प्टमध्ये टॅग करु शकतो. असे केल्यावर हे एआय सिस्टीम त्या व्यक्तीच्या प्रोफाइलवरील फोटो वापरुन त्याचा चेहरा हुबेहूब नवीन इमेज समाविष्ट करते. विशेष म्हणजे, यासाठी मेटा त्या मूळ युजर्सची कोणतीही परवानगी घेत नाही किंवा त्यांना कोणतीही नोटीस किंवा सूचना पाठवत नाही. सर्व पब्लिक अकाऊंट्ससाठी हे सेटिंग बाय-फॉल्ट (आधीपासूनच) ऑन ठेवण्यात आले.

मेटाच्या स्वतःच्या हेल्प पेजवर नमूद करण्यात आले की, एआय फीचर्स जेव्हा युजर्सच्या साहित्याचा वापर करुन नवीन आशय तयार करतील, तेव्हा त्यांना त्याची माहिती दिली जाणार नाही. याचा अर्थ, कोणीतरी तुमच्या इंस्टाग्राम फोटोंचा वापर करुन एआय इमेज बनवू शकते आणि तुम्हाला त्याची पुसटशी कल्पनाही येणार नाही.

यावर उपाय म्हणून मेटाने 'कंटेंट सील' नावाची एक वॉटरमार्क सिस्टीम सुरु केली, जी ते इमेज एआयने बनवले असल्याचे सिद्ध करते. परंतु, यामुळे आधीच तयार झालेल्या इमेजवर युजर्सचे नियंत्रण राहत नाही आणि चेहऱ्याचा गैरवापरही रोखता येत नाही. जर तुम्हाला तुमचे फोटो एआयच्या या वापरापासून सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुम्हाला इंस्टाग्राम अ‍ॅपमधील 'सेटिंग्ज'मध्ये काही बदल करावे लागतील.

असे बंद करा हे सेटिंग

सर्वात आधी इंस्टाग्राम अ‍ॅप ओपन करुन तुमच्या प्रोफाइल पेजवर जा. तिथे वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेनू आयकॉन टॅप करा. खाली स्क्रोल करुन 'शेअरिंग अँड रियूज' हा पर्याय निवडा. त्यानंतर 'अलो पीपल टू युज युअर कंटेंट ऑन इंस्टाग्राम अँड विथ एआय फीचर्स ऑन मेटा' सर्च करा. येथे तुम्हाला 'पोस्ट्स' (Posts) आणि 'रील्स' (Reels) समोरील टॉगल बटण बंद करावे लागेल. हे सेटिंग बंद केल्यामुळे भविष्यात तुमच्या पब्लिक फोटोंचा वापर एआय संदर्भासाठी करु शकणार नाही. मात्र, हे सेटिंग बदलण्यापूर्वी जे एआय फोटो आधीच तयार झाले आहेत, ते डिलीट होणार नाहीत आणि तुमचे अकाऊंट प्रायव्हेट केल्यानंतरही जुन्या इमेजवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

सध्या मेटा हे अपडेट टप्प्याटप्प्याने रोलआउट करत असल्याने, काही युजर्सना हे सेटिंग दिसण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT