External Affairs Minister S Jaishankar Dainik Gomantak
ग्लोबल

Hindu Temple Attack: अमेरिकेतील हिंदू मंदिरात खलिस्तान्यांचे भ्याड कृत्य; भारत आक्रमक, परराष्ट्र मंत्री म्हणाले...

US Hindu Temple Attack: कॅनडानंतर आता अमेरिकेत हिंदू मंदिराशी छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

US Hindu Temple Attack: कॅनडानंतर आता अमेरिकेत हिंदू मंदिराशी छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. नेवार्क, कॅलिफोर्निया येथील हिंदू मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ट्विटरवर काही फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेच्या भिंतींवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण घोषणा लिहिलेल्या दिसतात. खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेचे नावही भिंतींवर लिहिलेले आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, 'अशा असामाजिक तत्वांना देशात स्थान देऊ नये.' सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने हे प्रकरण अमेरिकन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे आणि चौकशी सुरु आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "अतिरेकी आणि फुटीरतावादी शक्तींना भारताबाहेर जागा मिळू नये. आमच्या वाणिज्य दूतावासाने (अमेरिकेला) जे काही घडले त्याची माहिती दिली. आम्ही तक्रार दाखल केली आहे. आणि आम्हाला आशा आहे की, याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असेल.”

दुसरीकडे, सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून यामुळे भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर (एक्स) लिहिले की, "या घटनेने भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही या प्रकरणाची त्वरित चौकशी आणि तोडफोड करणाऱ्या आरोपींविरुद्ध अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे."

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. मंदिराचे प्रवक्ते भार्गव रावल म्हणाले की, "मंदिराच्या शेजारी राहणाऱ्या एका भाविकाने इमारतीच्या बाहेरील भिंतीवर हिंदूविरोधी आणि भारतविरोधी भित्तिचित्रे पाहिली आणि स्थानिक प्रशासनाला ताबडतोब कळवण्यात आले."

अमेरिका आणि कॅनडामध्ये अशा घटना वाढल्या

अमेरिका आणि कॅनडामध्ये यापूर्वीही हिंदू मंदिरांशी छेडछाड झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: कॅनडात मंदिरांची तोडफोड आणि त्यांच्या भिंतींवर लिहिलेल्या खलिस्तान समर्थक घोषणांच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहिल्या होत्या. जी-20 शिखर परिषदेपूर्वी ही घटना घडली. SFI ने दिल्ली मेट्रो स्थानकांचे फुटेज देखील जारी केले जिथे 'दिल्ली बनेगा खलिस्तान' आणि 'खलिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा लिहिल्या होत्या. सप्टेंबरमध्ये या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, तर आणखी एका आरोपीला काही दिवसांनी ताब्यात घेण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT