ग्लोबल

Israel-Hamas War: हमासने थाई अन् इस्रायली नागरिकांसह 25 ओलिसांची केली सुटका; युद्धादरम्यान मोठे यश

Israel-Hamas War: इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार हमासने 25 ओलिसांची सुटका केली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही महिन्यांपासून युद्ध सुरु होते. मात्र कतार आणि अमेरिकेच्या शिष्टाईने इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी झाली. यातच आता, इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार हमासने 25 ओलिसांची सुटका केली आहे. या ओलीसांमध्ये 12 थाई आणि 13 इस्रायली नागरिकांचा समावेश आहे.

7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांना ओलीस ठेवले होते. त्यांनी त्यांना गाझा येथे नेले होते आणि नंतर त्यांची सुटका करण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या.

थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले की, गाझामधून 12 थाई ओलिसांची सुटका करण्यात आली असून दूतावासाचे अधिकारी त्यांना मायदेशी घेऊन येण्यासाठी जात आहेत. सुटका करण्यात आलेल्या ओलीसांची नावे आणि इतर तपशील लवकरच कळतील, असे त्यांनी सांगितले.

इस्रायली न्यूज वेबसाईट i24NEWS च्या वृत्तानुसार, 13 इस्रायली ओलिसांनाही हमासने सोडले असून त्यांना रेड क्रॉसकडे सुपूर्द केले आहे. सुटका करण्यात आलेले ओलिस रफाह क्रॉसिंगच्या दिशेने जात आहेत. तत्पूर्वी, इस्रायल आणि हमास यांच्यातील करारांतर्गत चार दिवसांचा युद्धविराम शुक्रवारी सकाळी लागू झाला.

राजनयिक प्रगतीमुळे गाझामधील 2.3 दशलक्ष लोकांना काही दिलासा मिळाला आहे, ज्यांनी इस्रायली बॉम्बफेकीचे हल्ले सहन केले आहेत. 7 ऑक्टोबरच्या हमास (Hamas) हल्ल्यात पकडलेल्या आपल्या प्रियजनांबद्दल काळजीत असलेल्या इस्रायलमधील कुटुंबांसाठीही ही एक दिलासादायक बातमी आहे.

तथापि, युद्धविराम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हल्ले पुन्हा सुरु करण्यास वचनबद्ध असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलने सांगितले की, युद्धबंदी लागू झाल्यानंतर काही वेळातच इंधनाचे चार टँकर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे चार टँकर इजिप्तमधून गाझा पट्टीत दाखल झाले.

युद्धबंदी दरम्यान इस्रायलने प्रतिदिन 1,30,000 लिटर इंधन पुरवण्याचे मान्य केले आहे. तथापि, गाझाच्या दैनंदिन 1 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त गरजेच्या तुलनेत हा एक छोटासा भाग आहे.

गेल्या सात आठवड्यांच्या युद्धात इस्रायलने (Israel) गाझाला होणारा इंधन पुरवठा रोखला होता. त्याचा वापर हमास लष्करी कारणांसाठी करु शकतो, असा दावा त्यांनी केला होता.

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला. त्यावेळी 1400 हून अधिक इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आली होती, तर अनेकांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल युद्ध पुकारले आणि गाझा पट्टीवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात हमासचे दहशतवादी मारले गेले. मात्र, इस्रायलच्या हल्ल्यात नागरिकही बळी पडले आहेत. गाझामधील एकूण मृतांची संख्या 15 हजारांहून अधिक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT