Benjamin Netanyahu  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासने फेटाळला इस्रायलचा युद्धविरामाचा प्रस्ताव? रक्तरंजित युद्धादरम्यान...

Israel-Hamas War: गाझामध्ये सुरु असलेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: गाझामध्ये सुरु असलेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. इस्रायलने हमाससमोर युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता, पण हमासने तो फेटाळला. इस्रायलने 40 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात सात दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव हमासला दिला होता. पण हमासला आता काहीतरी वेगळे हवे आहे.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध दिवसेंदिवस उग्र होत आहे. गाझामधील नरसंहारामुळे जगभरातील देश चिंतेत आहेत. आता इस्रायलने हमाससमोर युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता, असे वृत्त आहे. मात्र इस्रायलचा प्रस्ताव हमासने फेटाळून लावला. एकेकाळी गाझामध्ये युद्धविरामाची सातत्याने मागणी करणाऱ्या हमासने इस्रायलची मागणी धुडकावून लावत नवी खेळी खेळली आहे. इजिप्शियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हमासने 40 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात एक आठवड्याचा युद्धविराम स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. इजिप्शियन अधिकार्‍यांनी पुढे सांगितले की, चर्चेदरम्यान हमासचे नेते इस्माईल हानीयेह यांनी सांगितले की, गाझामध्ये पूर्ण युद्धविराम होईपर्यंत ते एकाही ओलीस सोडणार नाहीत, असे वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे. या संमतीशिवाय इस्रायलशी कोणतीही चर्चा होणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

दुसरीकडे, हमासच्या पॉलिटिकल विंगचे प्रमुख इस्माईल हानीयेह यांनी इस्रायलच्या ऑफरवर चर्चा करण्यासाठी कैरो येथे गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घेतली. गाझामध्ये संपूर्ण युद्धविराम आणि इस्रायलच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी अधिक मानवतावादी मदत मिळवण्याच्या चर्चेला त्यांनी सहमती दर्शवली. विशेष म्हणजे, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा या चर्चेत प्रथमच समावेश करण्यात आला. इस्रायलच्या ऑफरच्या बदल्यात संपूर्ण युद्धविराम आणि 100 ओलिसांच्या बदल्यात सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी हमासने केली आहे.

दुसरीकडे, गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात इस्रायली आर्मीला दररोज यश मिळत आहे. एकीकडे हमासचे युद्धात सातत्याने नुकसान होत आहे, तर दुसरीकडे इस्रायलला गाझमधील नरसंहाराने गोत्यात आणले आहे. गाझामध्ये आतापर्यंत किमान 20 हजार लोक मारले गेले आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आणि मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Today's Live Updates Goa: IFFIच्या काळात पाचपेक्षा जास्ती लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT