Israel-Hamas War: ''पाकिस्तानने इस्रायलला धमकावले तर...'', हमासच्या 'बिन लादेन'चे आवाहन

Israel-Hamas War: गाझामध्ये हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेले युद्ध आता शिगेला पोहोचले आहे.
Hamas Leader Ismail Haniyeh
Hamas Leader Ismail Haniyeh Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: गाझामध्ये हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेले युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोक मारले गेले. 50 हजारांहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, पण या युद्धाचा अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. दरम्यान, हमासचा 'ओसामा बिन लादेन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्माईल हानियाने पाकिस्तानला इस्रायलला अणुयुद्धाची धमकी देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, हमासचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हानिया यानेही पाकिस्तानमध्ये आयोजित हमास नेते आणि इस्लामिक विद्वानांच्या परिषदेला संबोधित केले. तो म्हणाला की, पाकिस्तान हा अण्वस्त्रसंपन्न देश आहे. जर त्याने इस्रायलला अणुयुद्धाची धमकी दिली तर हे युद्ध थांबवता येईल. त्याने मुस्लिम देशांच्या समर्थनार्थ पुढे यावे. तो पुढे म्हणाला की, "पाकिस्तान एक मजबूत देश आहे. पाकिस्तानने इस्रायलला धमकावले तर युद्ध थांबू शकते. पाकिस्तानकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. तो इस्रायलला माघार घेण्यास भाग पाडू शकतो."

Hamas Leader Ismail Haniyeh
Israel-Hamas War: जीवन बनले नरक! इस्रायली हल्ल्यात 17 दिवसांच्या मुलीचा गेला जीव; भावाचाही मृत्यू

दुसरीकडे, पाकिस्तान आपल्या अणुबॉम्बला 'इस्लामिक अणुबॉम्ब' म्हणत आला आहे. एवढेच नाही तर आपला अणुबॉम्ब मुस्लिम देशांच्या रक्षणासाठी असल्याची फुशारकी पाकिस्तान मारत आला आहे. धर्माचे हे पत्ते खेळून पाकिस्तानने सौदी अरेबियापासून ते यूएईपर्यंत कोट्यवधी डॉलर्सची भीक मिळवली. पण हमासमुळे त्याचे खोटे उघड झाले आहे. इस्रायलच्या विरोधात हमास सातत्याने पाकिस्तानकडे मदत मागत आहे. पाकिस्तानने इस्रायलला धमकावावे असे तो म्हणत आहे.

इस्माईल हानिया हा हमासचा अध्यक्ष आहे. 2017 पासून खालिद मेशालचा उत्तराधिकारी म्हणून त्याने हमासचे नेतृत्व स्वीकारले. आजकाल तो कतारची राजधानी दोहा येथे राहतो. तेथून तो संघटना चालवतो, कारण इजिप्तने त्याला गाझामध्ये येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. हमासमध्ये अनेक युनिट्स आहेत, जे राजकीय, लष्करी किंवा सामाजिक कामे करतात. एक सल्लागार संस्था हमासचे धोरण ठरवते. त्याचे मुख्यालय गाझा पट्टीत आहे. हानियाच्या गाझा येथील घरावर आयडीएफने बॉम्ब टाकला होता.

Hamas Leader Ismail Haniyeh
Israel-Hamas War: इस्रायली लष्कराचा हमास दहशतवाद्याच्या घरावर छापा; दोन ब्रीफकेसमध्ये सापडली करोडोंची रोकड

इस्रायल विरुद्ध हिजबुल्ला आणि हुथी दहशतवादी

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र या युद्धाचा अद्याप निकाल लागलेला नाही. एकीकडे इस्रायलची लढाऊ विमाने गाझामध्ये बॉम्बचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे लष्कर भूयुद्धात हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. या युद्धात एकीकडे इस्त्रायल आहे, जो त्याच्यावरील हल्ल्याचा खुलेआम बदला घेत आहे, तर दुसऱ्या बाजूला हमास ही दहशतवादी संघटना आहे, ज्यांच्याशी लेबनॉनचे हिजबुल्लाह आणि येमेनचे हुथीचे दहशतवादी लढत आहेत. हमास गाझा पट्टीतून हल्ले करत आहे. हिजबुल्ला लेबनीजच्या भूमीतून तेल अवीवला लक्ष्य करत आहे. दहशतवादी संघटना हुथीही इस्रायलवर रॉकेट डागत आहे. इस्रायलनेही आता हमास, हिजबुल्लाह आणि हुथी यांना पराभूत करण्यासाठी त्रिस्तरीय हल्ले सुरु केले आहेत. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हिजबुल्लाहचे अनेक रॉकेट हवेतच नष्ट केले. इस्रायलच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लेबनीजच्या हद्दीत गोळीबार करणाऱ्या दहशतवादी पथकांवरही हल्ले केले आहेत.

दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या या युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांसह हजारो इस्रायली नागरिक मारले गेले. यामध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबारात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्याबरोबरच 350 हून अधिक लोक हमासच्या दहशतवाद्यांनी मारले. यानंतर घटनास्थळी मृत आणि ओलीस ठेवलेल्यांच्या स्मरणार्थ बॅनर लावण्यात आले. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावरील भू आणि हवाई हल्ले तीव्र केले.

Hamas Leader Ismail Haniyeh
Israel-Hamas War: युद्धामुळे इस्रायलचे आर्थिक संकट गडद, नेतन्याहू म्हणाले; ''जीडीपीच्या आणखी एक टक्का...''

दुसरीकडे, गाझाला जमीन, सागरी आणि हवाई मदत वाढवण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचा तिसरा व्हेटो टाळण्यासाठी यूएन सुरक्षा परिषदेने ठरावावरील मतदान पुढे ढकलले. 8 डिसेंबर रोजी अमेरिकेने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्याला ठरावाला व्हेटो केला होता. परंतु 12 डिसेंबर रोजी, 193-सदस्यीय महासभेने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचा ठराव 153-10 मतांनी बहुमताने मंजूर केला. मात्र, प्रचंड बहुमताने मंजूर होऊनही या प्रस्तावाचा युद्धावर विशेष परिणाम झाला नाही.

Hamas Leader Ismail Haniyeh
Israel-Hamas War: युद्धविराम संपताच गाझामध्ये पुन्हा इस्रायली हल्ले सुरु, दोन दिवसांत 700 जणांचा मृत्यू; सर्वत्र हाहाकार!

इस्रायलने रफाह भागात जोरदार गोळीबार सुरु केला

गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या हल्ल्यांची व्याप्ती वाढत आहे. आता इस्रायलने रफाह भागात जोरदार गोळीबार सुरु केला आहे. हा तो भाग होता जो सुरक्षित मानून गाझामधील इतर ठिकाणचे विस्थापित लोक येथे पोहोचत होते. मात्र आता दक्षिण गाझामधील रफाह परिसरही इस्रायली लष्कराच्या निशाण्यावर आहे. मंगळवारी इस्रायली सैनिकांनी दक्षिण गाझामधील रफाह भागात जोरदार हवाई हल्ले केले. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com