Yahya Sinwar Dainik Gomantak
ग्लोबल

Yahya Sinwar: हमासचा 'लादेन' कोण आहे सिनवार? इस्रायली सैन्य गाझामध्ये घेतयं शोध!

Who is Yahya Sinwar: इस्रायलच्या शहरांवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हमासचा दुसरा प्रमुख नेता याह्या सिनवार याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Manish Jadhav

Who is Yahya Sinwar: इस्रायलच्या शहरांवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हमासचा दुसरा प्रमुख नेता याह्या सिनवार याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इस्रायली अधिकार्‍यांनी गाझामधून त्याला आणि त्याच्या कार्यकर्त्यांना संपवण्याची शपथ घेतली आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिनवार आणि ओसामा बिन लादेन याच्यात कोणताही फरक नाही. अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यामागे जसा लादेनचा हात होता, त्याचप्रमाणे इस्रायलवरील हवाई हल्ल्याचा मास्टरमाईंड सिनवार आहे.

या हल्ल्यात 1300 इस्रायली लोक मारले गेले. इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, सिनवार आणि त्याची टीम आमच्या दृष्टीक्षेपात आहे.

कोण आहे सिनवार

दरम्यान, 1962 मध्ये जन्मलेला सिनवार दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात मोठा झाला. हा भाग त्यावेळी इजिप्तच्या (Egypt) ताब्यात होता. इस्रायली सैन्याने त्याला "खान युनूसचा कसाई" असे संबोधले, जे त्याच्या मूळ गावाचे नाव आहे.

वृत्तानुसार, सिनवारचे कुटुंब प्रथम आश्केलॉन येथे स्थायिक झाले, जे आता दक्षिण इस्रायलमध्ये आहे. परंतु इस्रायलने 1948 मध्ये पूर्वी अल-मजदल या नावाने ओळखल्या जाणार्‍या

आश्केलॉनचा ताबा घेतल्यानंतर त्याला गाझा येथे स्थलांतरित होण्यास भाग पाडले गेले होते. सिनवारने गाझा येथील इस्लामिक विद्यापीठातून अरबी अभ्यासात पदवी प्राप्त केली आहे.

24 वर्षे तुरुंगात घालवली

सिनवारने तब्बल 24 वर्षे इस्रायलच्या (Israel) तुरुंगात घालवली आहेत. 1982 मध्ये त्याला पहिल्यांदा विध्वंसक कारवायांसाठी अटक करण्यात आली होती.

त्यानंतरच्या वर्षांमध्ये, पॅलेस्टिनी चळवळीतील इस्रायली हेरांना लक्ष्य करणारी एक युनिट तयार करण्यासाठी त्याने सलाह शेहादेहसोबत युती केली होती. शेहादेह याची 2002 मध्ये इस्रायली सैन्याने गोळ्या झाडून हत्या केली होती, जेव्हा तो हमासच्या लष्करी शाखेचे नेतृत्व करत होता.

1987 मध्ये हमासच्या स्थापनेनंतर सिनवार हा हमासचा खास बनला होता. 1988 मध्ये, दोन इस्रायली सैनिक आणि चार पॅलेस्टिनींच्या हत्येप्रकरणी सिनवारला अटक करण्यात आली होती. पुढच्या वर्षी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

जेव्हा इस्रायलने सिनवार सोडले

2006 मध्ये, हमासची लष्करी शाखा असलेल्या इज्ज अद-दीन अल-कासम ब्रिगेडच्या एका पथकाने इस्रायली हद्दीत प्रवेश करण्यासाठी बोगद्याचा वापर केला आणि लष्कराच्या चौकीवर हल्ला केला होता.

त्यांनी त्यावेळी दोन इस्रायली सैनिकांना ठार केले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे, त्यांनी गिलाड शालित या एका इस्रायली सैनिकाला ताब्यात घेतले होते. शालितला पाच वर्षे तुरुंगात घालवावी लागली होती.

2011 मध्ये कैदी स्वॅप डीलमध्ये त्याची सुटका झाली होती. शालितच्या सुटकेसाठी इस्रायलने 1,027 पॅलेस्टिनी आणि इस्रायली अरब कैद्यांची सुटका केली. त्यापैकी एक 'सिनवार' होता.

2017 मध्ये गाझाची कमांड दिली

त्याच्या सुटकेनंतरच्या वर्षांमध्ये, सिनवार हमासचा पॉप्युलर चेहरा म्हणून उदयास आला. 2015 मध्ये, सिनवारचे नाव अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आले होते.

सिनवारला दहशतवादी म्हणून घोषित करणाऱ्या यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, हमासची लष्करी शाखा इझेदिन अल-कसाम ब्रिगेडच्या स्थापनेत त्याची महत्त्वाची भूमिका होती. 2017 मध्ये सिनवार गाझामधील हमासचा प्रमुख म्हणून निवडला गेला.

हानियेह नंतर दुसरा प्रमुख नेता

संघटनेच्या पॉलिटिकल ब्युरोचे प्रमुख इस्माइल हनीयेह याच्यानंतर हमासच्या नेतृत्वात सिनवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वैच्छिक हद्दपारीत हानियेह राहत असल्याने, सिनवार हा गाझाचा वास्तविक शासक आहे.

त्याने सातत्याने इस्रायलच्या विरोधात सशस्त्र संघर्षाचा पुरस्कार केला आहे आणि कोणत्याही सेटलमेंट फॉर्म्युल्याच्या विरोधात आहे. तो त्याच्या भडक भाषणांसाठी ओळखला जातो. त्याची हमासशी पूर्ण निष्ठा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ओसामा बिन लादेनसारखाच...

इस्रायलने सिनवारवर गेल्या आठवड्याच्या शेवटी इस्रायली शहरांवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, 9/11 हल्ल्याला ओसामा बिन लादेन जसा जबाबदार होता, तसाच सिनवार हा इस्रायलवरील हवाई हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT