Israel Hamas War: हमासचा क्रूरपणा! इस्रायली घरांवर केलेले हल्ले आणि निष्पापांच्या हत्येचे व्हिडिओ समोर

Israel Hamas War: तीन मिनिटांच्या क्लिपमध्ये सशस्त्र हमास अतिरेकी दुचाकीवरुन गाझा आणि इस्रायलची सीमा ओलांडत असल्याचे दिसत आहे. नंतर ते पुढे नागरिकांच्या घरात घुसतात आणि दिसेल त्याच्यावर गोळीबार करतात.
The Israel Defense Forces (IDF) released a video showing how Hamas militants firing on Israel civilians.
The Israel Defense Forces (IDF) released a video showing how Hamas militants firing on Israel civilians.Dainik Gomantak
Published on
Updated on

The Israel Defense Forces (IDF) released a video showing how Hamas militants firing on Israel civilians:

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. एकीकडे हमासचे सैनिक इस्रायलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करत आहेत, तर दुसरीकडे इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सोमवारी हमासचे अतिरेकी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसून नागरिकांवर गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ जारी केला.

हा व्हिडिओ हमास अतिरेक्याच्या बॉडी कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचे दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी चित्रित करण्यात आला हे स्पष्ट झाले नाही.

7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यादरम्यान हा चित्रित झाल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

“रॉ फुटेज: हमासचे जिहादी दहशतवादी एका निरपराध इस्रायली नागरिकांची हत्या करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दहशतवाद्याला इस्रायली सुरक्षा दलांनी मारले आहे,” असे इस्त्रायली सैन्याने X वर लिहिले आहे.

IDF ने या भयानक व्हिडिओसाठी "ट्रिगर वॉर्निंग" देखील जारी केली आहे.

The Israel Defense Forces (IDF) released a video showing how Hamas militants firing on Israel civilians.
Israel Hamas War मुळे हेट क्राइम फोफावला, सहा वर्षांच्या मुस्लिम चिमुकल्यावर चाकूने 26 वार

तीन मिनिटांच्या या क्लिपमध्ये सशस्त्र हमास अतिरेकी जोरदार दुचाकीवर स्वार होऊन गाझा आणि इस्रायलची सीमा ओलांडत असल्याचे दाखवले आहे. ते एक सुरक्षा बूथ ओलांडण्यासाठी पुढे जातात आणि नागरिकांच्या घरात प्रवेश करतात आणि दिसेल त्या प्रत्येकावर गोळीबार करत असतात.

पुढे व्हिडिओमध्ये हमासचे अतिरेकी एका घरात घुसताना दिसत आहेत. जिथे दहशतवाद्यांना एकही नागरिक सापडला नाही. पण त्या घरात मोठ्याने सुरू असलेल्या गाण्यांमुळे नागरिक दहशतवाद्यांच्या भितीने काही मिनिटांपूर्वीच पळून गेले असावेत. त्यानंतर अतिरेकी त्यांचा शोध घेत घरातून फिरताना दिसत आहेत.

The Israel Defense Forces (IDF) released a video showing how Hamas militants firing on Israel civilians.
Israel-Hamas War: 'मी देशासोबत', युद्धाच्या परिस्थितीत भारतीय नागरिकाचा इस्रायलमध्ये राहण्याचा निर्णय

व्हिडिओच्या शेवटी हमासचे दहशतवादी घरातून बाहेर पडताना ते इस्रायली सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मारले गेल्याचे दिसत आहे. गोळी झाडल्यानंतर दहशतवादी खाली पडला तेव्हा त्याचा बॉडी कॅमेरा आकाशाकडे वळाल्याचे दिसते.

तत्पूर्वी, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात 7 ऑक्टोबर रोजी गाझा सीमेजवळ नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलच्या ट्राइबमध्ये टॉयलेटवर हमासचे बंदूकधारी गोळीबार करताना दिसत होते.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला सोमवारी दहा दिवस झाले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी, हमासने इस्रायलवर हल्ला केला ज्यात किमान 1,300 लोक मारले गेले. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा येथे हवाई हल्ले केले. ताज्या अपडेटनुसार, दोन्ही बाजूंनी किमान 4,000 लोक मारले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com