Top Hamas Commander Bilal al-qadra Killed, Islamic Jihad Headquarters Also Destroyed:
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासचा आणखी एक वरिष्ठ कमांडर मारला गेला आहे. इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री हवाई हल्ल्यात दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर बिलाल अल-काद्रा याला ठार केले.
इस्रायलच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी शनिवारी रात्री गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेच्या दक्षिण खान युनिस बटालियनवर हल्ला केला.
मारला गेलेला दहशतवादी इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला जबाबदार होता. त्यानेच दक्षिण इस्रायलच्या किबुत्झ निरीम आणि निरोज भागातील घरांमध्ये घुसून लोकांची हत्या केली.
हमास या दहशतवादी संघटनेत काम करण्यासोबतच कादरा पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावत होता.
इस्रायल संरक्षण दलाच्या निवेदनानुसार, आयडीएफने झेटुन, खान युनिस आणि वेस्ट जबलियाच्या शेजारील हमासच्या शंभरहून अधिक स्थानांवर हल्ला केला. एवढेच नाही तर हमासच्या त्या ऑपरेशनल ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले होते जेथून दहशतवादी इस्रायलवर हल्ले करत असत.
इस्रायली सैन्याने हमासचे इस्लामिक जिहाद कौन्सिलचे मुख्यालय, कमांड सेंटर, मिलिटरी कॉम्प्लेक्स, डझनभर लाँचर पॅड, अँटी-टँक पोस्ट आणि वॉच टॉवर उध्वस्त केले.
यात पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेचे लष्करी मुख्यालयही उद्ध्वस्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, IDF ने हमासच्या अनेक पायाभूत सुविधा देखील नष्ट केल्या. या पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक लोक IDF विरुद्धच्या लढ्यात सक्रियपणे सहभागी झाले होते.
हमाससोबतच्या लढाईदरम्यान, इस्रायली सैन्याने पॅलेस्टाईनच्या लोकांना उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता.
आयडीएफने शुक्रवारी म्हटले होते की, गाझामधील लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात जावे. इस्रायलच्या या इशाऱ्यादरम्यान गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविक, इस्रायलने गाझा पट्टीतील वीज आणि पाण्याचा पुरवठा बंद केला आहे. दुकानात रेशन संपले असून त्यांच्याकडे खायला काहीच नाही. जेव्हा लोक आपला जीव वाचवण्यासाठी गाझा पट्टी सोडायचा प्रयत्न करत आहेत तेव्हा हमास त्यांना अडवत आहे.
हमास हे करत आहे कारण इस्रायलने लवकरच जमिनीवर कारवाई सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत हमासचे दहशतवादी समोरासमोरच्या लढाईत गाझा पट्टीतील सामान्य नागरिकांचा सुरक्षा कवच म्हणून वापर करु शकतात.
हमास पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिण गाझाकडे जाण्यापासून रोखत असल्याचा दावा इस्रायल संरक्षण दलाने केला आहे.
दरम्यान, गाझामधील मृतांची संख्या 2215 वर पोहोचली आहे. यामध्ये 724 मुलांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.