Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षात मोठा ट्विस्ट? हमासचे शिष्टमंडळ रशियात दाखल

Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी गुरुवारी जगाला धक्का दिला की, हमासचे शिष्टमंडळ मॉस्कोला भेट देत आहे.

यानंतर, हमासच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या मौसा मोहम्मद अबू मारझूकच्या नेतृत्वाखाली हमासचे शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली. खुद्द रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीला दुजोरा दिला आहे.

संघर्षावर रशियाची भूमिका काय आहे?

खरे तर, रशियाच्या अधिकृत आरआयएने हमासच्या शिष्टमंडळातील एका स्त्रोताचा हवाला देत सांगितले की, मॉस्कोला भेट देणाऱ्यांमध्ये हमासचा कमांडर अबू मारझूक आहे.

रशियाचे इस्रायल, इराण, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि हमाससह मध्य पूर्वेतील सर्व प्रमुख सदस्यांशी संबंध आहेत. सध्याच्या संकटासाठी अमेरिका (America) जबाबदार असल्याचे मास्कोचे म्हणणे आहे. यासोबतच, रशियाने तोडगा काढण्याच्या उद्देशाने इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा चर्चा सुरु करण्याचे आवाहन केले आहे.

काय ट्विस्ट येणार?

हमासच्या शिष्टमंडळाच्या या भेटीवर सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. या युद्धात काही ट्विस्ट येणार की नाही हे येणारा काळच सांगेल. रशियाचे पुढचे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या इराणचे (Iran) उप परराष्ट्र मंत्री अली बगिरी कानी हे देखील सध्या मॉस्को दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे उप परराष्ट्र मंत्री मिखाईल गलुजिन यांच्याशी चर्चा केली आहे, असेही रशियाकडून सांगण्यात आले. बघिरी कानी हे इराणचे प्रमुख आण्विक वार्ताकार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Attack: रस्त्यात अडवून पोलिसांना मारहाण, बेतूल घटनेनंतर वास्कोत 'गुंडाराज'; गोव्यात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका?

Rohit Sharma Post: आशिया कपसाठी टीम जाहीर; क्रिकेटप्रेमी खूश, पण 'मुंबईचा राजा' टेन्शनमध्ये, स्टोरी टाकत म्हणाला, 'Stay Safe...'

Viral Video: ‘पानिपतचं तिसरं युद्ध!’ शेतात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, व्हायरल व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्ही पाहिलाय का?

"हे लिकेजचं सरकार, मंत्र्यांच्या घरात गळती..." 'कदंब' बसच्या दुरवस्थेवरून LoP संतप्त; Watch Video

Crime News: 13 वर्षीय भाच्याला 10 वेळा चाकूनं भोसकलं, ‘मेला’ म्हणून झुडुपांत फेकून दिलं, पण...; मामानेच केला घात

SCROLL FOR NEXT