Gurpatwant Singh Pannu Video| BSE |NSE| Share Market
Gurpatwant Singh Pannu Video| BSE |NSE| Share Market Dainik Gomantak
ग्लोबल

12 मार्चला Share Market मध्ये काय होणार? दहशतवादी पन्नूच्या नव्या व्हिडिओत BSE, NSE उध्वस्त करण्याची धमकी

Ashutosh Masgaunde

Gurpatwant Singh Pannu has released a video threatening to destroy Indian economy, he has threatened to target BSE, NSE on March 12:

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पुन्हा एकदा भारताला उघड धमकी दिली आहे. यावेळी पन्नू यांनी भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. यासाठी पन्नूने एक व्हिडिओही जारी केला आहे.

खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू 'सिख फॉर जस्टिस' नावाची संस्था चालवतो. पन्नू सातत्याने हिंदूंच्या विरोधात वक्तव्ये करत आहे. यासोबतच खलिस्तानच्या मागणीबाबत अनेक बेकायदेशीर कारवायांमध्येही त्याचा सहभाग आहे. पन्नूला भारतात दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्या संस्थेवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, गुरपतवंत सिंग पन्नूने भारताची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्याने १२ मार्च रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

नुकत्याच जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, पन्नूने दावा केला की, तो भारताला आर्थिकदृष्ट्या लक्ष्य करत आहेत. कारण भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा कणा आहे. यासोबतच पन्नूने व्हिडीओ मेसेजमध्ये भारतातील लोकांना १२ मार्चपूर्वी भारतीय स्टॉक्सची विक्री करत अमेरिकन स्टॉक खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

फक्त 12 मार्च का?

पन्नूने 12 मार्चचा दिवसही एका खास कारणासाठी निवडला आहे. खरे तर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत पन्नूने आता 12 मार्चलाच बीएसई आणि एनएसईला टार्गेट करून नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

यंदा 12 मार्च रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवादी पन्नू असे व्हिडिओ सतत जारी करत असतो. या व्हिडिओंमध्ये तो भारताविरुद्ध विष ओकत असतो. याआधीही पन्नूने भारतीय मुस्लिमांना भडकवण्यासाठी व्हिडिओ जारी केले होते. पन्नूने वेगळ्या शीख देशाचीही मागणी केली आहे.

जुलै 2020 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने पन्नूला दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी बेकायदेशीर क्रियाकलाप (UAPA) कायद्याच्या कलम 51A अंतर्गत त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली.

पन्नू सतत भारताविरोधात मोहीम राबवत असून पंजाबमधील तरुणांना दहशतवादाकडे प्रेरित करतो. पन्नूने यूकेस्थित दहशतवादी परमजीत सिंग पम्मा आणि ठार झालेला दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांच्यासोबत काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Today's Live News: सुकूर येथे ट्रक आणि कारचा अपघात

राजस्थानमधून गुजरातमध्ये करायचा विदेशी मद्य तस्करी; 50 हजारांचे बक्षीस असणारा डांगी अखेर गोव्यात जेरबंद

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT