Who Is Goldy Brar Terrorist Under UAPA: केंद्र सरकारने सोमवारी गँगस्टर गोल्डी ब्रारला UAPA कायद्यातर्गंत दहशतवादी घोषित केले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्रार हा भारतविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेशी संबंधित आहे. गोल्डी ब्रार 2022 मध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला जेव्हा त्याने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तो कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये राहत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला गँगस्टर गोल्डी ब्रारचा कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता ते सांगणार आहोत. गोल्डी ब्रार 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर भारतातून कॅनडाला गेला होता. एका टीव्ही मुलाखतीत त्याने परदेशातून मूसेवालाच्या हत्येचा प्लॅन आखला होता. तो मूळचा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील रहिवासी आहे, ब्रारने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, गोल्डी ब्रारला क्रॉस बॉर्डर एजन्सीचे समर्थन आहे. अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग असून तो कट्टरतावादी विचारसरणीचा समर्थक आहे. यासोबतच त्याने अनेक नेत्यांना फोन करुन धमक्या दिल्या असून त्यांच्याकडून खंडणीही मागितली आहे.
गोल्डी ब्रारने देखील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येचे दावे केले आहेत. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे उच्च दर्जाचे शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि विस्फोटक सामग्रीची तस्करी करण्यातही त्याचा सहभाग आहे. हत्या करण्यासाठी आणि शार्पशूटर्संना पुरवण्यासाठी या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गोल्डी ब्रार आणि त्याचे सहकारी पंजाबमधील शांतता, सांप्रदायिक सलोखा आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. यासाठी तो तोडफोड, दहशतवादी माड्युल तयार करणे, टार्गेट किलिंगसह अनेक देशविरोधी कारवाया करत आहे.
ब्रार हा देशातच नाही तर परदेशातही वान्टेड आहे. 12 डिसेंबर 2022 रोजी फ्रान्सच्या इंटरपोल सचिवालयाने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याशिवाय, 15 जून 2022 रोजी ब्रार याच्याविरोधात लुकआउट परिपत्रकही जारी करण्यात आले होते.
शस्त्रास्त्र तस्करीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये अनेक केंद्रीय आणि राज्य संस्था त्याचा शोध घेत आहेत. पंजाब पोलिसांनी त्याच्याविरोधात अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचाही समावेश आहे. 2022 मध्ये डेरा समर्थक प्रदीप सिंह कटारिया यांच्या हत्येची जबाबदारीही त्याने घेतली होती. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख सदस्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.