Afghanistan Crime Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: बंदूकधाऱ्याची क्रूरता! नमाज पठन करणाऱ्या 6 जणांची केली हत्या; शिया समुदयाच्या मशिदीला बनवले लक्ष्य

Afghanistan Crime: अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंदूकधाऱ्या व्यक्तीने नमाज पठन करणाऱ्या सहा जणांवर गोळीबार केला.

Manish Jadhav

Afghanistan Crime: अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंदूकधाऱ्या व्यक्तीने नमाज पठन करणाऱ्या सहा जणांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम अफगाणिस्तानातील एका मशिदीत घुसून एका बंदूकधाऱ्या व्यक्तीने गोळीबार सुरु केल्याने तिथे नमाज पठन करणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. स्थानिक माध्यमानेही यासंबंधीचे वृत्त दिले आहे. माजी अफगाण राष्ट्रपतींनी सांगितले की, ''बंदूकधाऱ्याने जाणीवपूर्वक शिया समुदायाच्या मशिदीला लक्ष्य बनवले.''

तालिबान (Taliban) शासित गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री हेरात प्रांतातील गुजरा जिल्ह्यात हा हल्ला झाला. या घटनेची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून बंदूकधारी घटनास्थळावरुन पळून गेला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मशिदीच्या इमामाचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

माजी राष्ट्रपतींनी या हल्ल्याचा निषेध केला

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी 'X' वर पोस्ट करत सांगितले की, “मी इमाम जमान मशिदीवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. मी हा दहशतवादी हल्ला मानवतावादाविरुद्ध मानतो." अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशननेही या हल्ल्याचा निषेध केला असून या घटनेत एका मुलासह सात जण ठार आणि अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले. इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटना या तालिबानच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. या दहशतवादी संघटना अनेकदा शाळा, रुग्णालये, मशिदी आणि शियाबहुल भागांना लक्ष्य करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT