Suella Braverman
Suella Braverman Dainik Gomantak
ग्लोबल

Suella Braverman: गोमंतकीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहसचिव सुएला यांना राणी एलिझाबेध पुरस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

गोमंतकीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन (Britains Home Secretary Suella Braverman) यांना राणी एलिझाबेध II पुरस्कार (Queen Elizabeth II) जाहीर झाला आहे. वुमन ऑफ द इयर असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लंडनमध्ये (London) एका पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येईल. राणी एलिझाबेध II यांच्या नावाचा हा पहिलाच पुरस्कार असून, तो सुएला यांना मिळाल्याने गोमंतकीय नागरिकांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे.

मेरी एलिझाबेथ ट्रस उर्फ ​​लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवड झाली आहे. भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक (Rushi Sunak) यांचा ट्रस यांनी पराभव केला. ट्रस यांच्या मंत्रीमंडळात 42 वर्षीय सुएला ब्रेव्हरमन यांची वर्णी लागली आहे. अलिकडेच राणी एलिझाबेध II यांचे निधन झाले. एलिझाबेध यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या एशियन अचिव्हमेंट्स अवॉर्डसाठी (AAA 2022) सुएला ब्रेव्हरमन यांची निवड झाली आहे. सुएला यांनी या पुरस्काराबाबत आनंद व्यक्त केला आहे.

ब्रिटनच्या गृहसचिव असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी आपल्या पदाबाबत बोलताना असे सांगितले की, 'ब्रिटन संसदेत काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. या संधीचा उपयोग मी लोकांची सेवा करण्यासाठी करेन. माझे आईवडील 1960 साली या देशात आले. आशिया समुदायाचा भाग असणे माझे सौभाग्य आहे.' असे ट्रस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

गोमंतकीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या आई उमा या तमिळच्या असून, त्यांचे वडील क्रिस्टी फर्नांडिस हे गोव्याचे आहेत. राणी एलिझाबेध II यांच्या नावाचा पहिला पुरस्कार सुएला यांना मिळाल्याने गोमंतकीय नागरिकांनी कौतुक व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT