King Charles
King CharlesDainik Gomantak

Elizabeth II यांच्या निधनानंतर राजघराण्यात संघर्ष, किंग चार्ल्सने मेघनवर टाकला बहिष्कार

Prince Harry Insult: राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजघराण्यात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे.
Published on

The Duke Of Sussex Prince Harry: राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजघराण्यात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरीने किंग चार्ल्स तिसरे आणि त्यांचा भाऊ प्रिन्स ऑफ वेल्स यांच्यासोबत बालमोरल येथे भोजन करण्यास नकार दिला, असे डेलीमेलने वृत्त दिले. तसेच, नवे सम्राट हॅरी यांच्या पत्नी मेघन मार्केल यांना राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूच्या दिवशी शोकग्रस्त शाही परिवारात सामील होण्यास रोखण्यात आले होते.

वृत्तानुसार, प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मार्केल 8 सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ यांचा अंतिम निरोप घेण्यासाठी रॉयल्स स्कॉटिश इस्टेटला रवाना झाला होता. तथापि, ब्रिटनच्या नव्या राजाने कथितपणे त्यांना येण्यास मनाई केली. बातम्यांनुसार, प्रिन्स हॅरी यांनी किंग चार्ल्स, क्वीन कॉन्सोर्ट कॅमिला आणि विल्यम यांच्यासोबत भोजन करण्यास नकार दिला.

King Charles
Queen Elizabeth II funeral: महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्ययात्रेचे फोटो

2 वर्षांपूर्वी राजेशाही कार्य सोडले

अहवालात पुढे म्हटले की, प्रिन्स हॅरी हे राजघराण्यातील पहिले सदस्य होते, जे एबरडीनहून ब्रिटिश एअरवेजच्या सुरुवातीच्या विमानातून प्रवास केला होता. एबरडीन विमानतळावर सकाळी 9.20 वाजता आल्यानंतर त्यांनी सकाळी 10 वाजता लंडनला (London) जाण्यासाठी फ्लाइट घेतली होती. दोन वर्षांपूर्वी, प्रिन्स हॅरी आणि त्यांची राणी मेघन मर्केल यांनी शाही कर्तव्यांना त्यागून कॅलिफोर्नियाला (California) गाठले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com