Women Cadets Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arab: आनंदी आनंद गडे! सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलात दाखल झाल्या मुली

Saudi Arab: सौदी अरेबिया आता अधिकाधिक उदारमतवादी होत आहे. जगात आपली प्रतिमा बदलण्यासाठी आता सौदी सातत्याने उदारमतवादी धोरणे राबवत आहे.

Manish Jadhav

Saudi Arab: सौदी अरेबिया आता अधिकाधिक उदारमतवादी होत आहे. जगात आपली प्रतिमा बदलण्यासाठी आता सौदी सातत्याने उदारमतवादी धोरणे राबवत आहे. याच कारणामुळे आता सौदी अरेबियात महिलांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्याचे काम सुरु आहे.

कारण सध्या सौदीची प्रतिमा परंपरावादी देश अशी आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिला कॅडेट्स त्यांच्या लष्करी गणवेशात दिसत आहेत.

या सर्व मुलींनी सोमवारी किंग फहद सिक्युरिटी कॉलेजमधून पदवी घेतली. यावेळी त्या आपला आनंद व्यक्त करत होत्या. कॉलेजने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांचे अभिनंदन करताना दिसत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ही चौथी बॅच आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये मुलींच्या (Girls) माताही उपस्थित होत्या. ज्यांनी मुलींना लष्करी गणवेशात पाहून आनंद व्यक्त केला.

यावेळी एका कॅडेटने सांगितले की, 'आम्ही सर्व प्रशिक्षकांचे त्यांच्या प्रयत्नांसाठी आभारी आहोत'. दुसरी मुलगी म्हणाली, 'आम्ही अनेक कौशल्ये आत्मसात केली. आम्हाला शक्ती आणि आत्मविश्वास मिळाला आहे.

क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सादर केलेल्या किंगडम व्हिजन 2030 अंतर्गत, देशातील महिलांना जास्तीत जास्त संधी देणे हे उद्दिष्ट आहे. महिलांना हळूहळू प्रत्येक क्षेत्रात संधी दिली जात आहे.

महिला सैन्यात भरती होऊ शकतात

2019 मध्ये, सौदी अरेबियाने (Saudi Arabia) महिलांना देशाच्या सशस्त्र दलात सेवा करण्याची परवानगी देण्याची घोषणा केली होती. महिला सौदी अरेबिया आर्मी, रॉयल सौदी एअर डिफेन्स, रॉयल सौदी नेव्ही, रॉयल सौदी स्ट्रॅटेजिक मिसाइल फोर्स आणि सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये सामील होऊ शकतात.

याआधी, 2021 मध्ये महिला सैनिकांची पहिली तुकडी बाहेर पडली होती. 14 आठवड्यांच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले.

सौदी अरेबियात महिलांना अधिकार मिळतात

सौदी अरेबियाला आपली अर्थव्यवस्था तेलाकडून पर्यटनाकडे वळवायची आहे. पण पर्यटन उद्योग त्याच्यासाठी तितकासा सोपा नाही. याचे कारण सौदीची प्रतिमा परंपरावादी देश म्हणून आहे.

हे लक्षात घेऊन सौदीने 2018 मध्ये महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली होती. त्याचवेळी, सौदीने नुकतेच आपल्या अंतराळ मोहिमेसाठी पहिल्यांदाच एका महिलेला अंतराळात पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT