Saudi Prince कडून भारताचं तोंडभरुन कौतुक, पाकिस्तानला दाखवला ठेंगा; आखाती देशात...

Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia: सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये भारत-गल्‍फ कोऑपरेशन कॉन्सिलच्या बैठकीत भारताचे जोरदार स्वागत करण्यात आले.
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi ArabiaDainik Gomantak
Published on
Updated on

Gulf Cooperation Council: पाकिस्तानची दयनीय अवस्था कोणापासून लपलेली नाही. एवढ्या कंगालीत त्याचा जवळचा मित्र आणि मोठा मुस्लिम देश सौदी अरेबियानेही त्याला दगा दिला आहे.

दुसरीकडे, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये भारत-गल्‍फ कोऑपरेशन कॉन्सिलच्या बैठकीत भारताचे जोरदार स्वागत करण्यात आले.

वास्तविक, पाकिस्तानने अलीकडच्या काळात अनेक वेळा मुस्लिम मित्र सौदी अरेबियाकडे कर्जाची भीक मागितली आहे. पण सौदी अरेबियाने त्याला 'भाव' दिला नाही.

सौदी अरेबियाची (Saudi Arabia) राजधानी रियाध येथे भारत-गल्‍फ कोऑपरेशन कॉन्सिलची बैठक पार पडली. यामध्ये पाकिस्तानचा मित्र सौदी अरेबियाने भारताचे मोकळेपणाने स्वागत केले.

यावरुन आशिया खंडात पाकिस्तानची स्थिती काय आहे आणि भारताचा दर्जा किती वाढला आहे, हे स्पष्ट होते. या बैठकीनंतर लवकरच मुक्त व्यापार कराराचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
China: सौदी अरेबिया अन् इराण यांच्यातील कराराचा भारतावर होणार परिणाम?

रियाधमधील बैठकीत अरब आणि भारत यांच्यात चर्चा झाली

भारत (India) आणि आखाती देशांदरम्यान रियाधमध्ये झालेल्या बैठकीत व्यापार आणि गुंतवणुकीच्या दिशेने झालेल्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.

या बैठकीत भारत आणि आखाती देशांमधील मुक्त व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरुप देण्यावर सहमती झाली.

यादरम्यान भारताने ऊर्जा, अन्न सुरक्षा, आरोग्य, आयटी क्षेत्र आणि दहशतवादविरोधी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी विशिष्ट क्षेत्रात काम करण्यासाठी संयुक्त कार्यगट तयार करण्याचे मान्य केले आहे.

GCC अंतर्गत सहा प्रमुख आखाती देश म्हणजे बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती.

भारताचा आखाती देशांशी 154 अब्ज डॉलरचा व्यापार आहे

या बैठकीत भारतासह सर्व 6 GCC देश सहभागी झाले होते. GCC देश भारतासाठी देखील महत्त्वाचे आहेत कारण या देशांमध्ये 8.5 दशलक्ष भारतीय काम करतात आणि ते दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचे परकीय चलन भारतात पाठवतात. 2021-22 मध्ये भारत आणि आखाती देशांदरम्यान 154 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. UAE आणि सौदी अरेबिया भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत.

Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
सौदी अरेबिया करणार ‘Squid Game’ चे आयोजन, 'असे' करणारा जगातील पहिला देश

अरबांनी पाकिस्तानला सांगितले 'आता बेलआउटमध्ये पैसे देणार नाही'

दुसरीकडे, सौदी अरेबियाने पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की, ते यापुढे चॅरिटीमध्ये व्याजाशिवाय पैसे देणार नाही. त्यासाठी पाकिस्तानला व्याज द्यावे लागेल.

वारंवार कर्ज मागत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गेल्या वर्षी एका परिषदेत पाकिस्तानची ही भीक मागण्याची सवय मान्य केली होती.

शाहबाज म्हणाले होते की, जेव्हा ते मित्र देशाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करतात तेव्हा त्यांना वाटते की, त्यांनी पैसे मागण्यासाठी फोन केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com