Saudi Arabia: तुर्कीला मोठी मदत; पाकिस्तानला बसला धक्का

Saudi Arabia: तुर्कीला कोणत्याही अटीशिवाय पाच अरब डॉलर डिपॉजिट दिले आहे .
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi ArabiaDainik Gomantak

Saudi Arabia: सौदी अरेबियाने तुर्कीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कीच्या केंद्रीय बॅंकेत पाच अरब डॉलर जमा करण्याचे निर्णय घेतल्याची घोषणा सौदी अरेबियाने केली आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानला मदत करण्यासाठी म्हणजेच कर्ज देण्यासाठी सौदी अरेबियाने अटी ठेवल्या आहेत आणि तुर्कीला कोणत्याही अटीशिवाय पाच अरब डॉलर डिपॉजिट दिले आहे .

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार तुर्कीला मदत करण्यासाठी, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सौदी अरेबिया किती कटिबद्ध आहे हे दिसून येते , असे सौदी अरेबियाने केलेल्या घोषणेत म्हटले आहे.

सौदी अरेबियाने उचललेल्या या पावलाने तुर्कीला मोठी मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण तुर्कीची अर्थव्यवस्था भूकंप आणि महागाई यामुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

तुर्कीमध्ये आलेल्या या विनाशकारी भूकंपाने 45 हजारांपेक्षा जास्त लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 12 शहरातील लोकांना बेघर व्हावे लागले आहे. याशिवाय तुर्कीमध्ये महागाई 55 टक्कयांवर पोहोचली आहे.

Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
Swami Nithyananda च नाही तर या पाच व्यक्तींनीही निर्माण केले स्व:ताचे देश

महागाईने उच्चांक गाठूनही तुर्की( Turkey )च्या राष्ट्रपतींनी व्याजदर वाढवले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जास्त व्याजदर घेणे हे इस्लामच्या नियमांविरुद्ध आहे.

दरम्यान, तुर्कीच्या या कठीण काळात सौदी अरेबियाने केलेल्या या मदतीने दोन्ही देशातले संबंध सुधारण्यास मदत होईल. या दोन इस्लामिक देशात सौदी अरेबिया( Saudi Arabia )च्या दूतावासात 2018 मध्ये पत्रकार जमाल खाशोज्जी यांची हत्या झाली होती. त्यावेळी या दोन देशातील संबंध बिघडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com