Germany finally approves India Biotech's covacin  Dainik Gomantak
ग्लोबल

अखेर जर्मनीने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला दिली मान्यता

यापूर्वी भारत बायोटेकच्या या लसीला जर्मनीमध्ये मान्यता नव्हती, ज्यामुळे ही लस घेतलेल्या सर्व लोकांना समस्यांचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमन्तक

भारतात तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या कोरोना लस कोवॅक्सिनला जर्मनीने मान्यता दिली आहे. या मंजुरीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यानंतर आता जर्मनीला जाणाऱ्या सर्व लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासी भारतीयांना 1 जूनपासून लसीकरण प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रवासासाठी कोवॅक्सीनला ही मान्यता देण्यात आली आहे.

(Germany finally approves India Biotech's covacin)

लोकांना मोठा दिलासा

ज्या लसीला कोणत्याही देशाने मान्यता दिली नाही, ती लागू करणाऱ्या प्रवाशांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. ज्यामध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्र, कोरोना चाचणी, क्वारंटाईन यासारख्या नियमांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोवॅक्सीन घेणार्‍या लोकांनाही जर्मनीमध्ये अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता, परंतु आता मंजुरी मिळाल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेत क्लिनिकल चाचण्यांवरील बंदी उठवली

याआधी, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने भारत बायोटेकच्या कोविड-19 लसीच्या 'कोव्हॅक्सीन'च्या तीन क्लिनिकल चाचण्यांपैकी फेज II वरील बंदी उठवली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये या लसीसाठी भारत बायोटेकचे भागीदार ओकुजेन इंक यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही कोवॅक्सीनसाठी आमची क्लिनिकल चाचणी पुढे चालू ठेवू शकतो याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की अतिरिक्त, भिन्न प्रकारची लस पुरवण्याची गरज प्राधान्याने राहिली आहे.

एप्रिलमध्ये चाचणी थांबवण्याचा एफडीएचा निर्णय यूएस कंपनीच्या चाचण्यांमध्ये सामील असलेल्यांना लसीच्या डोसवर तात्पुरती स्थगिती लागू करण्याच्या निर्णयावर आधारित होता. भारतातील लसीच्या उत्पादन युनिटवर जागतिक आरोग्य संघटनेच्या टिप्पण्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT