टेक्सासमधील शाळेवर गोळीबार म्हणजे नरसंहार - जो बायडन

अमेरिका पुन्हा एकदा गोळीबारानं हादरली
Texas school firing
Texas school firingDainik Gomantak

अमेरिकेतील टेक्सास शहरात अमेरिकेला हादरा देणारी एक घटना घडली आहे. या घटनेत 18 वर्षीय तरुणाने शाळेत घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात 18 मुलांसह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी पोलीसांनी प्रतिकार करत हल्लेखोरोला केलेल्या गोळीबार माथेफिरून तरुणाचा मृत्यू झाला आहे. (The school shooting in Texas is a genocide - Joe Biden )

Texas school firing
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या हत्येचा कट फसला

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही घटना म्हणजे, हत्याकांड असल्याचं म्हटलं आहे. तसेच ते म्हणाले कि, राष्ट्रपती झाल्यानंतर असं भाषण करावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. या घटनेत ज्यांच्या मुलांचा मृत्यू झाला. त्या सर्व कुटुंबांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या शाळांवरील हल्ल्यांबाबत या घटनांवर पुन्हा गांभिर्याने विचार करण्याची गरज असल्याचं ही ते यावेळी म्हणाले.

Texas school firing
Texas school firingDainik Gomantak

तसेच या घटनेबाबत बोलताना बायडन म्हणाले कि, सर्व पालक आणि जनतेला आवाहन करतो की, ही वेळ काहीतरी करण्याची आहे. आपण हे सहज विसरु शकत नाही. यासंदर्भात आपल्याला ठोस पावलं उचलत कृती करण्याची गरज आहे. तसेच वाढत असलेला बंदुकांचा बाजार याबाबत चिंता व्यक्ती केली. आणि आपण कधी अशा कृतींविरोधात ठोस पावले उचलण्याची ही गरज असल्याचं ही ते यावेळी म्हणाले.

Texas school firing
पाकिस्तानची नवी खेळी: भारताची हेरगिरी करण्यासाठी तयार केली सुंदर मुलींची 'पलटण'

जो बायडन म्हणाले की, हे सर्व निष्पाप चिमुकल्यांसोबत घडलं आहे. ही मुलं तिसरी आणि चौथीच्या वर्गात होती. यातील अनेक मुलांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना प्राण गमावताना पाहिलं आहे. दुर्दैवं म्हणजे, असे बरेच पालक आहेत, जे आपल्या मुलांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीत. मूल गमावणं म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग काढून टाकण्यासारखं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com