Afghan Blast: मजार-ए-शरीफ शहरात तीन मिनीबसमध्ये बॉम्बस्फोट, 9 जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात आणि मिनीबसमध्ये झालेल्या तीन स्फोटात किमान 16 जण ठार झाले.
Afghan Blast: मजार-ए-शरीफ शहरात तीन मिनीबसमध्ये बॉम्बस्फोट, 9 जण ठार
Published on
Updated on

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) उत्तरेकडील शहर मजार-ए-शरीफमध्ये बुधवारी मिनीबसमध्ये तीन बॉम्बस्फोट झाले, ज्यात किमान नऊ लोक ठार झाले आहेत. तर 15 जण जखमी झाले आहेत. बाल्ख प्रांतीय पोलिसांचे (Balkh Provincial Police) प्रवक्ते आसिफ वजीरी यांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, या शहरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन मिनीबसवर बॉम्ब ठेवण्यात आले होते. (Afghanistan Blast)

गृह मंत्रालयाने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी राजधानी काबूलमधील एका मशिदीमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट झाला, ज्यात किमान दोन लोक ठार झाले आणि 10 जण जखमी झाले. मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, हा बॉम्ब मशिदीतील पंख्याच्या आत ठेवण्यात आला होता.

Afghan Blast: मजार-ए-शरीफ शहरात तीन मिनीबसमध्ये बॉम्बस्फोट, 9 जण ठार
काश्मीरच्या या दहशतवादी संघटनेने घेतली TV अभिनेत्री अमरीन बटच्या हत्येची जबाबदारी

अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. मजार-ए-शरीफ हे दहशतवाद्यांचे खास लक्ष्य आहे. 28 एप्रिल रोजी, मजार-ए-शरीफ येथे मिनीबसमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात किमान नऊ जण ठार आणि 13 जण जखमी झाले. मजार-ए-शरीफमध्येच, 21 एप्रिल रोजी दुपारच्या नमाजाच्या वेळी सेह डोकान मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला ज्यामध्ये 12 उपासकांचा मृत्यू झाला आणि 58 लोक जखमी झाले. 21 एप्रिल, गुरुवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाले होते.

Afghan Blast: मजार-ए-शरीफ शहरात तीन मिनीबसमध्ये बॉम्बस्फोट, 9 जण ठार
इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमधील मेट्रो स्टेशनला लावली आग

तालिबानच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाले

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानने आम्ही देश सुरक्षित केल्याचा दावा केला आहे, परंतु आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि विश्लेषक तालिबानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचा पुन्हा उदय होण्याचा धोका आहे आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाने अनेक मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com