Annalena Baerbock|Bilawal Bhutto Zardari Twitter/@BBhuttoZardari
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये पोहोचताच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री कोरोनाबाधित, त्यात भुट्टोनी आळवला काश्मीर राग

दक्षिण आशियातील शांतता काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण निराकरणावर अवलंबून आहे

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेअरबॉक पाकिस्तान दौऱ्यावर आहे. हल्ली देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. अशातच पाकिस्तानमध्ये कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेअरबॉक (Annalena Baerbock) यांनी मंगळवारी आपला तीन देशांचा विदेश दौरा पुढे ढकलला. आपल्या दोन दिवसांच्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्यावर मंगळवारी आलेल्या बेअरबॉकने इस्लामाबादमध्ये आपले समकक्ष बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

खरं तर, दुपारच्या जेवणाच्या वेळी, बियरबॉकला अन्नाची चव लागत नव्हती. त्यानंतर त्यांनी एंटीजन टेस्ट केली होती, जी निगेटिव्ह आली. बायरबॉक पाकिस्ताननंतर ग्रीस आणि तुर्कस्तानला जाणार होत्या. मात्र त्यानंतर त्याना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या पुढील दौरा रद्द करण्यात आला आहे.

भुट्टो यांनी गायला काश्मीर राग

बेअरबॉक यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदेत भुट्टो यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग गायला. ते म्हणाले, "भारताच्या प्रक्षोभक पावलांमुळे काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे, भारत मुस्लिम बहुसंख्याकांना दुर्लक्षित करण्याचा आणि बेकायदेशीर उपायांनी त्यांना अल्पसंख्याक बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आशियातील शांतता काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण निराकरणावर अवलंबून आहे."

जर्मनीचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

एका प्रश्नाला उत्तर देताना जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेअरबॉक यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या ठरावांनुसार सोडवण्यास आपला पाठिंबा आहे. बर्बॉकने 2021 मध्ये नियंत्रण रेषेवर युद्धविराम मान्य करण्याच्या हालचालीचे स्वागत केले आणि दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्याच्या गरजेवर भर दिला.

भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर त्यांचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. वास्तव स्वीकारून भारतविरोधी प्रचार थांबवावा, असा सल्लाही भारताने पाकिस्तानला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT