पाकिस्तानकडून (Pakistan) सातत्याने ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा पुरवठा करण्याचा कट उधळून लावण्याची तयारी चालू झाली आहे. केंद्र सरकार (Central Government) यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला लागून असलेल्या काही भागात ड्रोनविरोधी यंत्रणा देखील बसवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सरकार काउंटर ड्रोन तंत्रज्ञानावर काम करताना दिसून येत आहे. ()
काउंटर ड्रोन तंत्रज्ञानाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयात या आठवड्यात मोठी बैठक झाली आहे. या बैठकीत सर्व निमलष्करी दलांचे प्रमुख देखील उपस्थित होते. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनवर चिंता व्यक्त केली आहे.
या बैठकीत निमलष्करी दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच भविष्यात ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना कसा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत एनआयए, बीएसएफ, एनएसजी आणि सीआयएसएफचे डीजीही उपस्थित होते.
नियंत्रण रेषेच्या बाजूने वाढलेल्या क्रियाकलाप
'पोलीस टेक्नॉलॉजी मिशन'वर झालेल्या बैठकीत काउंटर ड्रोन तंत्रज्ञानावर सर्वाधिक चर्चा झाली आहे. तसं पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या कारवाया होताना दिसून येत आहेत. पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि स्फोटके सातत्याने भारतीय सीमेवर पोहोचवण्यात येत आहेत. बुधवारी जम्मूमध्ये टिफिन आयडी पाठवण्याचा पाकिस्तानचा कट उधळून लावण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गेल्या वर्षी जूनपासून 9 पाकिस्तानी ड्रोनचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. तर यावर्षी 30 एप्रिलपर्यंत सीमेवर 53 ड्रोन दिसल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याच वेळी, 2020 मध्ये, एकूण 79 ड्रोन पाहिल्याचे अहवाल गृह मंत्रालयाला पाठवण्यात आले आहे. तर 2021 मध्ये एकूण 109 ड्रोनची पाहण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.