जगभरात महागाई शिगेला! जागतिक बँकेने जागतिक विकास दराचा अंदाज केला कमी

अन्नपदार्थांचा तुटवडा जाणवू शकतो, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेला मोठा धक्का बसला आहे.
Global Inflation
Global InflationDainik Gomantak
Published on
Updated on

World Bank: रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने मोठा धक्का दिला आहे. जागतिक बँकेने जागतिक अर्थव्यवस्थेच्या अंदाजात पुन्हा कपात केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात खाण्यापिण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच महागाई (Inflation) वाढण्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरातील महागाई (Global Economy) सर्वोच्च पातळीवर पोहोचत आहे, त्यामुळे यावेळी अंदाज कपात करण्यात आली आहे.

5.7 टक्क्यांच्या आधीच्या अंदाजानुसार,जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर या वर्षी 2.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये ते 5.7 टक्के आणि या वर्षी जानेवारीमध्ये 4.1 टक्के होते. जून महिन्यातील अंदाजापेक्षा हा आकडा खूप जास्त आहे.

Global Inflation
Zomato अन् Blinkit होणार एक! गुंतवणूकदार विकतायेत झोमॅटोचे शेअर्स

2023-24 मध्येही चांगली चिन्हे दिसणार नाहीत,जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटले आहे की, अनेक देशांमध्ये मंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या दोन वर्षांसाठी जागतिक विकास दर तीन टक्के राहण्याचा अंदाज आहे.

जागतिक बँकेनेही अमेरिकेच्या आर्थिक विकास दराचा अंदाज 2.5 टक्के कमी केला आहे, जो जानेवारीत 3.7 टक्के अपेक्षित होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी 2021 मध्ये, विकास दर 5.7 टक्के होता. युरो चलन असलेल्या 19 सदस्य युरोपीय देशांचा आर्थिक विकास दरही जानेवारीत 4.2 टक्क्यांच्या तुलनेत 2.5 टक्क्यांवर घसरला आहे . जो दर गेल्या वर्षी विकास दर 5.4% होता.

चीनचा विकास दर 4.3 टक्के असल्याचा अंदाज अमेरिकेनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा आर्थिक विकास दर गेल्या वर्षी 8.3 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 4.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये कोविड महामारी रोखण्यासाठी शांघाय आणि इतर शहरांमध्ये लागू करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन'मुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम झाला आहे. मात्र, चीन सरकारने आता निर्बंध शिथिल केले आहेत.

Global Inflation
गौतम अदानी करणार हेल्थकेअर क्षेत्रात एन्ट्री, ही कंपनी विकत घेण्यासाठी लावणार बोली

विकसनशील देशांचा विकास दर किती असेल?

उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्था या वर्षी 3.4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्था अजूनही कोरोना विषाणूच्या महामारीतून सावरत होती, अशातच रशिया-युक्रेन युद्धाचा ऊर्जा आणि गव्हाच्या जागतिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे . पूर्वी ज्या वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या, त्या आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे गरीब देशांमध्ये स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध होण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे कुपोषण आणि उपासमारीची समस्या वाढण्याचा धोका जास्त असल्याचे मालपास यांनी म्हटले आहे. जागतिक बँकेचा अंदाज आहे की या वर्षी तेलाच्या किमती 42 टक्क्यांनी वाढतील आणि बिगर ऊर्जा वस्तूंच्या किमती सुमारे 18 टक्क्यांनी वाढू शकतात. मात्र, तेल आणि इतर वस्तूंच्या किमती 2023 मध्ये आठ टक्क्यांनी कमी होतील असा अंदाजही जागतिक बॅंकेने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com