

Goa School Sports Event : नवचैतन्य क्रीडा पर्वांतर्गत येत्या रविवारी (ता. २२) डिचोलीत प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय भव्य बाल क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवारी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दिवसभर हा महोत्सव चालणार आहे. यात तालुक्यातील ६५ सरकारी प्राथमिक शाळांचे मिळून सुमारे बाराशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
शिक्षक, पालक आणि दात्यांच्या सहकार्यातून हा क्रीडा महोत्सव होत आहे, अशी माहिती नवचैतन्य क्रीडा पर्व आयोजन समितीचे अध्यक्ष विकास भगत, सचिव लक्ष्मण मिशाळ आणि समन्वयक गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयोजन समितीचे धाकटू पाटील, विनोद होबळे, योगेंद्र बांदेकर, साक्षी कामत, भारती पेडणेकर, प्रतीक्षा लाडे आणि रमिला काणेकर उपस्थित होते.
या ‘नवचैतन्य क्रीडा पर्व’ अंतर्गत दहा पारंपरिक तर दोन इनडोअर स्पर्धा होतील. क्रीडा महोत्सवासाठी शाळांची चार विभागांतून विभागणी करण्यात आली आहे. साळ विभागात १६, मये विभागात-१७, डिचोली-साखळी विभागात-१५ आणि पाळी विभागात-१७ शाळांची विभागणी करण्यात आली आहे. तर बालवाटिका, इ. पहिली ते दुसरी, इ. तिसरी ते चौथी आणि इ. ५वी ते ७ वी हे चार गट केले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सववाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांची उपस्थिती असेल.
डिचोली नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, साखळी नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, शिक्षण संचालक झिंगडे, समग्र शिक्षाचे संचालक शंभू घाडी, बालभवन संचालक मनोज सावईकर, स्नेहा फोरजी, संज्योती पावस्कर उपस्थित असतील. या महोत्सवाला क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाग शिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.