VIDEO: आधी दहशवादानं नाव खराब केलं, आता 'अडाणीपणानं' देशाचं हसू झालं, अमेरिकेत शाहबाज शरीफ क्लीन बोल्ड; तुम्हीच बघा नेमकं काय झालं?

Pakistan PM Shehbaz Sharif Speech Mistakes: पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वारंवार होणाऱ्या चुकांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीनच नाचक्की होत आहे.
Pakistan PM Shehbaz Sharif Speech Mistakes
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Prime Minister Shehbaz Sharif: भारताचा शेजारी देश पाकिस्तान आधीच जगभरात दहशतवाद आणि आर्थिक डबघाईमुळे बदनाम आहे. त्यातच पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वारंवार होणाऱ्या चुकांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीनच नाचक्की होत आहे. असाच एक लाजिरवाणा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या 'गाझा पीस बोर्डा'च्या पहिल्या बैठकीत शाहबाज शरीफ यांनी अधिकृत निवेदन वाचताना अशा काही चुका केल्या की, संपूर्ण पाकिस्तानवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली.

या बैठकीत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात अनेक गंभीर शाब्दिक चुका होत्या. शाहबाज शरीफ यांच्या 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यानच्या दोन दिवसीय अमेरिका दौऱ्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, पंतप्रधान असूनही शाहबाज शरीफ यांनी हे निवेदन वाचण्यापूर्वी त्यात सुधारणा करण्याची तसदी घेतली नाही. निवेदनाच्या मुख्य मथळ्यातच 'United States' ऐवजी 'Unites States' आणि 'America' ऐवजी 'Americas' असे चुकीचे शब्द छापले होते. शरीफ यांनी विचार न करता हे चुकीचे शब्द जसेच्या तसे वाचून दाखवले.

Pakistan PM Shehbaz Sharif Speech Mistakes
Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

हा प्रकार सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताच नेटकऱ्यांनी पाकिस्तान सरकारला चांगलेच धारेवर धरले. नेटकऱ्यांनी या चुकांचे स्क्रीनशॉट शेअर करत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाची आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवली. अनेक पाकिस्तानी नागरिकांनीही आपल्याच सरकारवर नाराजी व्यक्त करत "पंतप्रधानांना काहीच वाटत नाही" अशा शब्दात टीका केली. एका वापरकर्त्याने उपरोधिकपणे म्हटले की, "पाकिस्तानच्या हुशारीचे पडदे आता पूर्णपणे उघडले गेले आहेत."

Pakistan PM Shehbaz Sharif Speech Mistakes
India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार

विशेष म्हणजे, पाकिस्तानने (Pakistan) अशा प्रकारे स्वतःची फजिती करुन घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला होता, तेव्हा शाहबाज शरीफ यांच्या नावाने एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये हल्ल्याचा निषेध करताना 'Condemn' या शब्दाऐवजी चुकून 'Condom' असा अत्यंत आक्षेपार्ह शब्द लिहिला गेला होता. अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या चुकांमुळे जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचे हसू होत असून, देशाचे प्रशासन किती बेजबाबदार आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com