Flydubai co-pilot Gaza revenge plot Dainik Gomantak
ग्लोबल

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Flydubai Flight Co-Pilot Confession: दुबईहून तेल अवीवला जाणारी फ्लाईदुबईची फ्लाईट क्रमांक FZ1073 हायजॅक करण्यामागे आणि इस्रायलमध्ये भीषण हल्ला घडवून आणण्यामागे गाझामध्ये झालेल्या युद्धाचा बदला घेण्याचा कट होता.

Manish Jadhav

Co-pilot confession over Gaza revenge: दुबईहून तेल अवीवला जाणारी फ्लाईदुबईची फ्लाईट क्रमांक FZ1073 हायजॅक करण्यामागे आणि इस्रायलमध्ये भीषण हल्ला घडवून आणण्यामागे गाझामध्ये झालेल्या विनाशाचा बदला घेण्याचा कट होता, असा खळबळजनक खुलासा समोर आला.

इस्रायली ऑनलाइन न्यूज पोर्टल 'माको'ने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्याचा प्रयत्न करणारा ओमानचा को-पायलट हमम अल-हम्मामी याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर हा कबुलीजबाब दिला.

चौकशीदरम्यान हम्मामने अमीराती तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, "मी गाझाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केले. मला शहीद व्हायचे होते." या धक्कादायक खुलाशाने एकच खळबळ उडाली.

तपासात असेही उघड झाले की, हमम अल-हम्मामी हा इस्लामिक कट्टरपंथी विचारधारा आणि विचारांनी पूर्णपणे प्रभावित झाला होता. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अल-हम्मामी याला याआधीच त्याच्या याच अतिरेकी विचारसरणीमुळे ओमानच्या (Oman) राष्ट्रीय विमान कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. नंतर त्याच्या नावाशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन इस्रायली विमानांच्या कॉकपिटचे व्हिडिओ आणि अल-कायदाशी संबंधित व्यक्तींचे व्हिडिओ पोस्ट केल्याचे निदर्शनास आले.

या 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या थरारक घटनेत फ्लाईदुबईच्या फ्लाईट 1073 मध्ये 170 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये प्रामुख्याने इस्रायली नागरिक होते. विमान लँड होण्यास एक तास शिल्लक असताना, अल-हम्मामीने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला.

या झटापटीत विमान काही सेकंदांतच तब्बल 17,000 फुटांपेक्षा खाली आले. परंतु, कॅप्टन मच्छार यांनी अत्यंत धैर्याने हल्ल्याचा मुकाबला करत कॉकपिटचे दार उघडले, ज्यामुळे इतर प्रवाशांना आणि ऑफ-ड्यूटी पायलटला आत येऊन परिस्थिती नियंत्रणात आणता आली.

प्रवाशांच्या आणि पायलटच्या या संयुक्त धाडसामुळे एक मोठा विमान अपघात आणि इस्रायलमध्ये घडणारा 9/11 सारखा महाभयंकर हल्ला थोडक्यात टळला. इस्रायली मीडियानुसार, अल-हम्मामीने याआधी जुलै महिन्यातही असाच कट रचण्याचा विचार केला होता, परंतु क्रू मेंबरचा मित्र असल्यामुळे त्याने तो प्लॅन ऐनवेळी टाळला होता. सध्या अधिकारी त्याच्या फोनची, परदेश दौऱ्यांची आणि संपर्कांची कसून चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Goa Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

SCROLL FOR NEXT