North Carolina Dainik Gomantak
ग्लोबल

America: बलाढ्य अमेरिकेला शाप! उत्तर कॅरोलिना राज्यात गोळीबार; 5 ठार

America Crime: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.

दैनिक गोमन्तक

North Carolina: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ताज्या माहितीनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील नॉर्थ कॅरोलिना राज्यात गुरुवारी झालेल्या गोळीबारात एका ऑफ-ड्युटी पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, महापौर मेरी-अ‍ॅन बाल्डविन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "एक दुःखद बातमी आहे. रॅले शहरासाठी एक दुःखाचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5:00 नंतर, अज्ञाताने अनेक लोकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये पाच लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. त्यापैकी एक ऑफ ड्यूटी रॅले पोलीस (Police) अधिकारीही होता. तर संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.''

दुसरीकडे, संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पोलीस विभागाने ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, 'जखमींमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले होते.'

तसेच, युनायटेड स्टेट्समध्ये गोळीबार ही एक मोठी समस्या आहे, जिथे 2021 मध्ये सुमारे 49,000 लोक मरण पावले आहेत. त्या आकडेवारीचा अर्थ असा आहे की, दररोज 130 हून अधिक लोक गोळीबारात मारले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Rashi Parivartan: 30 वर्षांनंतर होणार 'शनी' परिवर्तन! 'या' 3 राशींच्या नशिबाला लागणार ग्रहण; साडेसातीचा फेरा घेणार तुमच्या संयमाची परीक्षा

Goa Budget 2026: गोव्याचा 'बजेट डे' ठरला! 6 मार्चला मुख्यमंत्री सावंत मांडणार अर्थसंकल्प; सभापती गावकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

T20 World Cup: पाकिस्तान अन् श्रीलंकेचं 'पॅकअप' अटळ? भारतही रामभरोसे; 51 वर्षांचा इतिहास 2026 मध्ये बदलणार? पाहा सुपर-8 चं डेंजर झोन गणित

VIDEO: 'PM शाहबाज शरीफ सह 3.5 कोटी लोक मारले गेले असते...'; भारत-पाक युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा!

Mahalaxmi Rajyog: मनाचा राजा अन् ग्रहांचा सेनापती देणार अफाट संपत्ती! महालक्ष्मी राजयोगानं पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; घरामध्ये नांदणार सुख-समृद्धी

SCROLL FOR NEXT