America: कॅलिफोर्नियात भारतीय वंशाच्या चार जणांचे अपहरण

कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या चार जणांचे अपहरण करण्यात आले आहे असुन याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
America
AmericaDainik Gomantak

कॅलिफोर्नियाच्या मर्सिड काउंटीमधून सोमवारी स्थानिक वेळेनुसार अपहरण करण्यात आलेल्या चार लोकांमध्ये आठ महिन्यांची मुलगी आणि तिच्या पालकांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मर्सिड काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, 36 वर्षीय जसदीप सिंग, 27 वर्षीय जसलीन कौर, त्यांची 8 महिन्यांची मुलगी आरोही ढेरी, 39 वर्षीय अमनदीप सिंग यांचे अपहरण करण्यात आले आहे.

पोलिसांनी (Police)संशयिताचे वर्णन सशस्त्र आणि धोकादायक असल्याचे सांगितले. या घटनेचा अधिक तपशील अद्याप सामायिक केलेला नाही, कारण तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात सुरू आहे. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, चार कुटुंबातील (Family) सदस्यांना महामार्ग 59 च्या 800 ब्लॉकमधील व्यवसायातून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले.

पोलिसांनी जनतेला केले असे आवाहन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कथित अपहरणाचे ठिकाण किरकोळ विक्रेते आणि रेस्टॉरंट्सने भरलेला रस्ता आहे. एनबीसी न्यूजने वृत्त दिले आहे की पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणत्याही संशयास्पद किंवा संभाव्य हेतूबद्दल कोणतीही माहिती प्रदान केलेली नाही. शेरीफच्या कार्यालयाने सोमवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही जनतेला संशयित किंवा पीडित व्यक्तीकडे जाऊ नये असे सांगत आहोत." अधिका-यांनी सांगितले की लोकांनी संशयित किंवा पीडित व्यक्तींकडे जाऊ नये आणि ते दिसल्यास 911 वर कॉल करावे.

America
World Animal Welfare Day: 'हे' आहेत जगातील सर्वात विचित्र प्राणी

2019 मध्येही अशीच घटना घडली होती

विशेष म्हणजे, 2019 मध्ये भारतीय वंशाचा तंत्रज्ञ तुषार अत्रे त्याच्या मैत्रिणीच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या संशयास्पद मृत्यूपूर्वी, एका डिजिटल मार्केटिंग (Digital Marting) कंपनीच्या मालकाचे कॅलिफोर्नियातील त्याच्या पॉश घरातून अपहरण करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com