Heatwave Alert Dainik Gomantak
ग्लोबल

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

Europe Extreme Heatwave 2026 Red Alert: युरोप खंडाला सध्या निसर्गाच्या भीषण प्रकोपाचा सामना करावा लागत आहे.

Manish Jadhav

Europe Extreme Heatwave 2026 Red Alert: युरोपला सध्या निसर्गाच्या भीषण प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि स्पेनसह युरोपमधील तब्बल 26 देश सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, 14 हून अधिक देशांमध्ये तीव्र उष्णतेबाबत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. बहुतांश देशांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 43 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचल्याने सामान्य जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

उष्णतेचा सर्वात मोठा फटका फ्रान्सला बसला असून, तिथे आतापर्यंत 58 लोकांचा मृत्यू झाला. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, कडक उन्हापासून सुटका करुन घेण्यासाठी लोकांनी नद्या आणि तलावांकडे धाव घेतली, मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत 40 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तसेच, उष्माघातामुळे 2 लहान मुलांसह 18 जणांनी आपला जीव गमावला. वाढत्या तापमानाचा देशाच्या वीज पुरवठ्यावरही विपरीत परिणाम झाला.

फ्रान्समधील ‘गोलफेश न्यूक्लियर पॉवर प्लांट’ सोमवार रात्री बंद करावा लागला. या अणुऊर्जा प्रकल्पाला थंड ठेवण्यासाठी गारोन नदीचे पाणी वापरले जाते, परंतु या नदीचे तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. फ्रान्स सरकारने खबरदारी म्हणून 1350 हून अधिक शाळा बंद केल्या. तसेच, फ्रान्समधील प्रसिद्ध वार्षिक स्ट्रीट म्युझिक फेस्टिव्हल ‘फेत द ला म्युझिक’ दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

अतिउष्णतेमध्ये मद्यपान केल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सरकारला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, ही उष्णता 2003 मधील त्या ऐतिहासिक आपत्तीसारखीच आहे, ज्यामध्ये सुमारे 15 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

दुसरीकडे, ब्रिटनमध्येही उष्णतेने 50 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची चिन्हे आहेत. ब्रिटनच्या हवामान खात्याने बुधवार आणि गुरुवारसाठी ‘रेड एक्स्ट्रिम हीट वॉर्निंग’ जारी केली असून, तिथे तापमान 39 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज आहे. यामुळे 1976 मधील 50 वर्षे जुना विक्रम मोडू शकतो. तिथे रात्रीचे तापमानही 20 अंश सेल्सिअसच्या खाली येत नाहीये. जर्मनी आणि बेल्जियममध्येही अशीच बिकट अवस्था आहे. जर्मनीत नद्या-तलावांमध्ये पोहायला गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर बेल्जियममध्ये शाळांना हाफ-डे करण्यात आला.

इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने रोम आणि मिलानसह 15 प्रमुख शहरांमध्ये रेड अलर्ट घोषित केला. स्पेनमध्येही रात्रीचे तापमान प्रचंड वाढल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळीही उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळत नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT