Germany
GermanyDainik Gomantak

Europe: भारतासारखीच 'या' देशात आहे 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा, जाणून घ्या

Culture Recycling in Germany: उदाहरणार्थ, भारतात जुन्या कपड्यांमध्ये पँट किंवा पायजमा असल्यास त्यामधून मुलांसाठी हाफ पँट किंवा शॉर्ट्स बनवतात.

Germany Leads List Of World’s Top Recyclers: भारतात दीर्घकाळापासून वस्तूंचे जतन करुन पुनर्वापर करण्याची परंपरा आहे. यूज अ‍ॅण्ड थ्रोच्या या युगातही टिपिकल देसी मानसिकता असलेले मध्यमवर्गीय लोक कोणतीही जुनी गोष्ट निरुपयोगी समजून फेकून देत नाहीत.

प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुन्हा वापरण्यायोग्य बनवली जाते. मग ते कपडे असोत किंवा इतर कोणतीही वस्तू, फेकून देण्याऐवजी किंवा कापून टाकण्याऐवजी नव्या पद्धतीने वापरण्याची परंपरा जर्मनीमध्येही आहे.

'रीसायकलिंग हा संस्कार'

लोकसंख्येच्या बाबतीत जर्मनी हा युरोपियन युनियनमधील सर्वात मोठा देश आहे. जर्मनीत दरवर्षी 30 दशलक्ष टन कचरा गोळा होतो.

येथील ग्रीन डॉट प्रणाली ही जगातील सर्वात यशस्वी रीसायकलिंग प्रणालींपैकी एक आहे. इथल्या परंपरांमध्ये ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडची झलक पाहायला मिळते.

घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्यावर येथील लोकांचा विश्वास आहे. जर्मनीमध्ये, देशाचा पूर्वेकडील भाग असो की, पश्चिमेकडील भाग, शक्य तितक्या गोष्टींचा पुनर्वापर करण्याची परंपरा आहे. जर्मनीमध्ये (Germany) वस्तूंचा पुनर्वापर करणे हा एक गंभीर व्यवसाय आहे.

Germany
Germany Get's New Defence Minister: बोरिस पिस्टोरियस बनले जर्मनीचे नवे संरक्षण मंत्री

शंभर वर्षांची परंपरा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, जर्मनीमध्ये वस्तूंच्या पुनर्वापराचा दर हा जगातील सर्वाधिक 56.0 टक्के आहे. यानंतर ऑस्ट्रियाचा क्रमांक लागतो. जर्मनीच्या रीसायकलिंग पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून संस्था येतात.

पहिल्या महायुद्धात वापर सराव सुरु झाला

संसाधने अधिकाधिक वापरता यावीत म्हणून पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीमध्ये रीसायकलिंग सुरु झाले. नॅशनल वुमन सर्विसच्या माध्यमातून वेस्ट कलेक्शन तयार करण्यात आले. पहिल्या महायुद्धातून धडा घेत नाझींनी टोटल वेस्ट रिकव्हरी मॉडेल तयार केले.

Germany
Donald Trump Case: डोनाल्ड ट्रम्प यांची पॉर्न स्टार प्रकरणी सुटका

जर्मन लोकांची मानसीकता भारतीयांसारखीच आहे.

उदाहरणार्थ, भारतात (India) जुन्या कपड्यांमध्ये पँट किंवा पायजमा असल्यास त्यामधून मुलांसाठी हाफ पँट किंवा शॉर्ट्स बनवतात. त्याचप्रमाणे जुने धोतरापासून गमछा बनवला जातो.

त्याचप्रमाणे जर्मनीमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर असो की जड धातूपासून बनवलेल्या वस्तू, सर्वांचा पुनर्वापर करुन त्याला असे स्वरुप दिले जाते की पाहणारेही चकीत होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com