Heatwaves In Europe: उष्म्यामुळे दरवर्षी 90,000 युरोपियन्स जीवाला मुकणार

युरोपियन एन्व्हायर्नमेंट एजन्सीच्या अहवालातील धक्कादायक माहिती
Heatwaves In Europe:
Heatwaves In Europe:Dainik Gomantak

Heatwaves In Europe: जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी काहीच  प्रयत्न केले नाहीत तर सन 2100 पर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे दरवर्षी 90 हजार युरोपियन नागरीकांचा मृत्यू होऊ शकतो, असे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. युरोपीयन एन्व्हायर्नमेंट एजन्सी या संस्थेने हा अभ्यास केला आहे.

Heatwaves In Europe:
United States: व्वा रे पठ्या! 33 सेकंदात जगातील सर्वात 10 तिखट मिर्च्या फस्त, गिनीज रेकॉर्डही मोडले

सन 2100 पर्यंत तापमानात 3 डीग्री सेल्सियसने वाढ झाल्यास दरवर्षी उष्णतेच्या लाटेमुळे 90 हजार युरोपियन्सचा मृत्यू होईल. जर तापमानात 1.5 डीग्री सेल्सियसची वाढ झाली तर उष्म्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वर्षाला 30 हजार इतका असेल, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांनी जागतिक तापमान वाढीवर नियंत्रणासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. तथापि, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी राखण्याच्या लक्ष्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

या अहवालात म्हटले आहे की, 1980 ते 2020 या काळात वाढत्या उष्म्यामुळे 1 लाख 29 हजार युरोपियन नागरिकांचा मृत्यू झाला. वारंवार येणाऱ्या हीट वेव्हज या हवामान बदलाशी संबंधित आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरिकरण यामुळे आगामी काही वर्षांमध्ये विशेषतः दक्षिण युरोपमध्ये ही संख्या वाढू शकते.  

Heatwaves In Europe:
Aruna Miller: अमेरिकेत भारतीयांचा डंका! अरुणा मिलर बनल्या मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नर

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार या वर्षात आत्तापर्यंत युरोपमध्ये उष्ण हवामानामुळे किमान 15 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पैकी जुन ते ऑगस्ट हे तीन महिने युरोपमध्ये सर्वाधिक उष्ण होते. अत्यंत उष्ण वातावरणामुळे युरोपमध्ये दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे. मध्ययुगानंतर प्रथमच युरोपमध्ये अशा दुष्काळाची वेळ आली आहे.

उष्णतेचा धोका तर आहेच शिवाय हवामान बदलामुळे युरोपमध्ये मच्छरांमुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंग्युसारखा संसर्गजन्य तापरोगांचाही मोठा धोका आहे. तसेच समुद्राच्या पाण्याची तापमान वाढही धोकादायक ठरणार आहे. विशेषतः बाल्टिक समुद्रकिनारी हे घडत आहे. कॉलरासारखा आजार पसरविणाऱ्या जीवाणूंसाठी पाण्याची ही तापमान वाढ पोषक असणार आहे. त्यातूनही रोगांचा प्रसार होऊ शकतो, असे संस्थेने म्हटले आहे.

तथापि, उष्ण तापमानामुळे युरोप खंडातील हे संभाव्य मृत्यू थांबवणे शक्य आहे. उष्णतेचे आरोग्यावरील परिणाम टाळण्यासाठी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन्स, शहरातील हिरवळ, शहरातील इमारतींचे योग्य डिझाईन आणि बांधकाम आणि कामाच्या वेळा आणि परिस्थिती यामुळे आरोग्यावरील उष्णतेचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात, असेही संस्थेने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com