US Europe Trade War: ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! युरोपियन युनियनसोबतचा मोडला व्यापार करार; नव्या व्यापार युद्धाचा उडणार भडका

Donald Trump Tariff Hike EU Cars: मध्यपूर्वेतील युद्धाच्या धगधगत्या वातावरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात एक मोठा धमाका केला.
Donald Trump Tariff Hike EU Cars
Donald TrumpDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump Tariff Hike EU Cars: मध्यपूर्वेतील युद्धाच्या धगधगत्या वातावरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात एक मोठा धमाका केला. ट्रम्प यांनी युरोपियन युनियनसोबतचा (EU) जुना व्यापार करार मोडीत काढत युरोपमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रक्सवर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली असून एक नवे जागतिक 'ट्रेड वॉर' सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणार असून जागतिक अर्थव्यवस्था अधिकच खिळखिळी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' अकाऊंटवर पोस्ट लिहून या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी युरोपियन युनियनवर व्यापार कराराचे पालन न केल्याचा आरोप केला. पुढील आठवड्यापासून हे 25 टक्के टॅरिफ लागू होणार असून यामुळे प्रामुख्याने युरोपियन बनावटीच्या गाड्या अमेरिकेत महागणार आहेत. ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जुलै 2025 मध्ये स्कॉटलंडमधील ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवर झालेल्या 'टर्नबेरी एग्रीमेंट'वर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली. या करारानुसार, अमेरिका युरोपियन वस्तूंवर 15 टक्क्यांपेक्षा जास्त टॅरिफ लावणार नाही, असे ठरले होते. मात्र, आता 25 टक्के टॅक्स लावून ट्रम्प यांनी या कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मानले जात आहे.

Donald Trump Tariff Hike EU Cars
Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

या निर्णयाचे आर्थिक परिणाम अत्यंत गंभीर असण्याची शक्यता आहे. 2024 च्या आकडेवारीनुसार, अमेरिका आणि युरोपियन युनियन दरम्यान दरवर्षी सुमारे 1.7 ट्रिलियन युरोचा (अंदाजे 2 ट्रिलियन डॉलर) व्यापार होतो. म्हणजेच दररोज सुमारे 4.6 बिलियन युरोची देवाणघेवाण होते. यापूर्वीच्या करारामुळे युरोपियन वाहन उत्पादकांना दरमहा 500 ते 600 दशलक्ष युरोची बचत होत होती, ज्यावर आता पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. जर हे टॅरिफ लागू झाले, तर कार आणि ट्रकच्या किमती वाढतील, ज्याचा परिणाम वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर होईल. पर्यायाने जागतिक स्तरावर महागाई वाढण्याचा धोका असून अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील राजनैतिक संबंधांमध्येही मोठी दरी निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Iran talks three hour meeting
donald trump mojtaba khamenei
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
Donald Trump China Spying Claim
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com