Israeli PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासचा अंत, नेतन्याहूंचे ध्येय: हिटलरच्या आत्मचरित्राची अरबी प्रत दाखवत बेंजामिन म्हणाले...

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या 26 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या 26 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकन अधिकारी युद्ध संपवण्याबरोबरच ओलिसांच्या सुटकेवर जास्त जोर देत आहेत. यावर इस्रायलचे म्हणणे आहे की, सर्व समस्यांवर हमासचा खात्मा हाच एकमेव उपाय आहे. पंतप्रधानांसह इस्रायलच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी हमासचा खात्मा होईपर्यंत गप्प बसणार नाही, अशी शपथ अनेक वेळा घेतली आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ॲडॉल्फ हिटलरच्या 'माइन काम्फ' या आत्मचरित्राची अरबी प्रत दाखवली. नेतन्याहू म्हणाले की, हे पुस्तक इस्रायली सैनिकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांच्या घरातून जप्त केले आहे. जेव्हा इस्रायल गाझामधील दहशतवाद्यांचा खात्मा करेल, तेव्हा सेमिटिक विरोधी विचारसरणीचाही अंत होईल. जर आपण नवीन नाझी म्हणजेच हमासच्या दहशतवाद्यांना संपवले नाही तर पुन्हा एकदा नरसंहार होऊ शकतो. गुप्तचर संस्थेचे संचालक विल्यम बर्न्स ओलिसांच्या सुटकेबाबत बोलण्यास तयार आहेत. नेतन्याहू म्हणाले की, मी माझ्या संरक्षण आणि अर्थ मंत्र्यांना अशी योजना बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे आपले संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत होईल.

इस्रायलने सडकून टीका केली

नेतन्याहू यांनी एक दिवस आधी आलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावरही सडकून टीका केली. आम्ही आमच्या नागरिकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, असे शुक्रवारी नेतन्याहू यांनी म्हटले होते. आपल्या लोकांच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलू. प्रत्येक देशाप्रमाणेच इस्रायललाही आपल्या अखंडतेचे रक्षण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. इस्रायल पॅलेस्टिनींविरुद्ध नरसंहार करत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. हे अपमानजनक आहे, असेही नेतन्याहू म्हणाले होते.

इस्रायलने जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीमध्ये केलेल्या अपवित्र कृत्याचा हा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने म्हटले होते की, इस्रायली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून अपवित्र कृत्य केले होते. दरम्यान, इस्रायलचे सैन्य हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हल्ले करत असून अतिक्रमणही करत आहे. इस्रायली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करत आहे, असे हमासचे म्हणणे आहे. हमासचे प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. हमाद म्हणाले की, इस्रायल कधीही चांगला शेजारी आणि शांतताप्रिय देश असू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT