Israel-Hamas War: हमासला दरमहा मिळतयं कोट्यवधीचं डोनेशन; इस्रायलसमोरील अडचणी वाढल्या

Israel-Hamas War: गाझावर नियंत्रण ठेवणारी दहशतवादी संघटना हमासबाबत इस्रायलने मोठा दावा केला आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गाझावर नियंत्रण ठेवणारी दहशतवादी संघटना हमासबाबत इस्रायलने मोठा दावा केला आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून हमासला मिळणाऱ्या देणग्या अनेक पटींनी वाढल्या आहेत आणि आता दर महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत असल्याचे इस्रायलचे मत आहे. हमासला हे पैसे ऑनलाइन मिळत असल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. गाझामधील नागरिकांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांमार्फत पैसे येत असल्याचे हमासचे म्हणणे आहे.

इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासला दर महिन्याला 8 दशलक्ष ते 12 दशलक्ष डॉलर्स (सुमारे एक अब्ज रुपये) मिळत आहेत. अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी हमासला मिळणारा ऑनलाइन निधी अनेक पटींनी वाढला आहे. इस्रायली आर्थिक-गुप्तचर अधिकाऱ्यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, हमासला ऑनलाइन-डोनेशन साइट्सवरुन मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. अमेरिकेलाही याची माहिती असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.

Israel-Hamas War
Israel Hamas War: गाझा बनले नरक; युद्धामुळे खान युनिस शहरातील हजारो लोक रुग्णालयात अडकले

सर्वत्र रक्तपात

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात 1,200 हून अधिक लोक मारले गेले होते आणि सुमारे 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर नोव्हेंबरमध्ये एक आठवडाभर युद्धविराम करण्यात आला, ज्यामध्ये इस्रायलने कैद केलेल्या 240 पॅलेस्टिनींच्या सुटकेच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांना सोडण्यात आले. 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिले आणि हजारो लोक मारले, असे हमास संचालित प्रदेशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, इस्रायली हल्ल्यामुळे मोठ्याप्रमाणात विनाश झाला आहे आणि गाझामधील अंदाजे 85 टक्के लोक विस्थापित झाले, तर 25,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले.

हमासच्या निधीवर लक्ष ठेवणे कठीण

मात्र, आंतरराष्ट्रीय दबावानंतरही इस्रायलचे हल्ले सुरुच आहेत. इस्रायलचा उद्देश हमासला पूर्णपणे नष्ट करणे हा आहे. आता या ज्यू देशाच्या नजरा हमासला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर आहे. परंतु हमासला मिळणाऱ्या पैशावर लक्ष ठेवणे अत्यंत कठीण आहे. कारण हमास वर्षानुवर्षे सर्व प्रकारच्या निर्बंधांना चकवा देत आहे. वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर नियर ईस्ट पॉलिसीचे फेलो मॅथ्यू लेविट म्हणाले की, "इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टिनींकडून वैध आणि अवैध अशा दोन्ही प्रकारच्या देणग्या मिळत आहेत आणि त्यात झपाट्याने वाढ झाली आहे यात शंका नाही."

ते म्हणाले की, देणगी देण्याची लोकांची आवड हमासच्या फायद्यासाठी काम करत आहे. मॅथ्यू म्हणाले की, "मी अशा अनेक धर्मादाय संस्था पुढे येताना पाहिल्या आहेत ज्यांवर आधी अमेरिकेने बंदी घातली होती, पण आता ते काही नवीन नावांनी हमासला देणगी देत ​​आहेत. पण अनेक नवीन संस्थाही पुढे आल्या आहेत ज्या हमासला पाठिंबा देत आहेत. उघडपणे देणग्या देत ​​आहेत."

Israel-Hamas War
Israel Hamas War: इस्रायलला मोठा झटका! गाझामधील हल्ल्यात 20 हून अधिक इस्रायली सैनिक ठार

"हा आर्थिक जिहाद आहे"

हमासच्या भावनिक आवाहनानेही देणग्या वाढवण्यात मोठे काम केले आहे. इस्रायलविरुद्धच्या लढ्यासाठी हमासच्या अधिकाऱ्यांनी जाहीरपणे देणग्या देण्याची मागणी केली होती. हमासचे नेते इस्माईल हनीयेह म्हणाले की, “ही केवळ मानवतावादी समस्या नाही. त्याला मोठे महत्त्व आहे. हा आर्थिक जिहाद आहे.”

इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, युद्धापूर्वी या देणग्या धर्मादाय संस्थांना दिल्या जात होत्या. हा पैसा मग मदत संस्थांसह विविध माध्यमातून हमासपर्यंत पोहोचला. हमासने गाझामधील स्थानिक व्यावसायिकांकडूनही पैसे मागितले. मात्र, हा पैसा कायदेशीर आहे की केवळ हमासला मदत करतोय, हे ठरवणे फार कठीण आहे. वृत्तानुसार, इस्रायली आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हमास इतर देशांमध्ये उपस्थित असलेल्या संघटनांद्वारे देखील पैसे उभारत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या संघटनांचा हमासशी उघडपणे संबंध नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com