Elon Musk New Tweet Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk: एलन मस्क वसवणार स्वत:चे नवीन शहर...

दैनिक गोमन्तक

Elon Musk Is Planning To Build A Town: एलन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मिडियावर चर्चेत येत असतो. आता तो स्वत:चे शहर वसवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे. 

रिपोर्टनुसार  मस्क यांच्याशी संबंधित यूनिट्स आणि त्यांच्या कंपन्या टेक्सासमध्ये हजारो एकर जमीन खरेदी करत आहेत. सांगितले जात आहे की, येथे जे शहर वसवले जाईल तेथे मस्क यांच्या कंपन्यांचे कर्मचारी राहणार आहेत.

रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ऑस्टिनजवळ आतापर्यंत 3500 एकर जमीन खरेदी केली गेली आहे. मस्क येथे जे शहर वसवणार आहेत, त्याचे नाव 'स्नेलब्रुक' ठेवले जाईल.

मीडिया रिपोर्टमध्ये लँड रेकॉर्ड्स आणि इंटरनल कंपनी कम्युनिकेशनच्या आधारावर शहराविषयी माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार एलन मस्क यांची इच्छा आहे की, त्यांच्या कंपन्या  Boring Co, टेस्ला आणि स्पेसएक्सचे कर्मचारी येथे निवास करतील.

या शहरात बाजारभावाच्या तुलनेत घरांचे (Home) भाडे कमी असेल. ऑस्टिनजवळ या सर्व कंपन्यांची मोठी प्रॉडक्शन फॅसिलिटीज आहेत. त्यामुळे या शहराजवळ नवीन टाउन वसवण्याचा प्रयत्न करत आहे. 

एका अहवालानुसार, मस्क यांची योजना 100 घरे बांधण्याची आहे. त्याचबरोबर शहरात स्विमिंग पुल आणि आउटडोर स्पोर्ट्स एरियाही पुरवला जाईल. यापूर्वी 2020 मध्ये मस्क यांनी घोषणा केली होती की, ते टेस्ला कंपनीचे मुख्यालय आणि आपले निवासस्थान कॅलिफोर्निया येथे हलवणार आहेत.

दरम्यान 2022 मध्ये टेस्ला कंपनीने ऑस्टिनमध्ये नवीन गिगाफॅक्ट्री मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली. तसेच स्पेसएक्स आणि बोरिंग कंपनीजवळ टेक्सासमध्येही ही सुविधा आहे. 

एलन मस्क यांची टीमने बास्ट्रोप काउंटीमध्ये टाउन सहभागी करण्याविषयी चर्चाही केली आहे. पण काउंटीकडून म्हटले आहे की, याबाबत कोणताही अर्ज आलेला नाही. दुसरीकडे असेही वृत्त आहे की, मस्क यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक व्यवस्थापकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

सांगितले जात आहे की, मस्क यांनी आपल्या  टीममधील  सर्वश्रेष्ठ कर्मचाऱ्यांची यादी देण्यास व्यवस्थापकांना सांगितले होते. 'बॉस' त्या आदेशाने मॅनेजर्सने  आपल्या टीममधील सर्वश्रेष्ठ कर्मचाऱ्यांची यादी त्यांच्याकडे सोपवली. पण त्यानंतर मस्कने या मॅनेजर्सना नोकरीवरून काढून टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT