Pakistan: आर्थिक संकटावर मात करण्यासाठी शहबाज सरकारची युक्ती; सैन्याच्या परेडवर...

Pakistan: 23 मार्च रोजी दरवर्षी पाकिस्तानमध्ये 1940 चा लाहोर संकल्प साजरा करण्यासाठी सैन्य परेड केला जातो.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak

Pakistan: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आर्थिक संकटामुळे पाकिस्तानच्या नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानचे सरकार यातून बाहेर पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे.

जागतिक स्तरावरदेखील पाकिस्तान आयएमएफ अर्थात इंटरनॅशनल मॉनेटरी फंड कडून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आयएमएफने कर्ज देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीत चीनने पाकिस्तानला मोठी मदत केल्याचे समोर आले आहे. मात्र पाकिस्तानची परकीय गंगाजळीमध्ये तुटवडा पडल्याने पाकिस्तानला अजूनही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानच्या शहबाज सरकारने आपले खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता याचा एक भाग म्हणून पाकिस्तानने सशस्त्र दलांचे वार्षिक परेडला कमी मर्यादित खर्च करण्याचे नियोजन केले आहे.

Shehbaz Sharif
Australia: 'मंदीरावर हल्ला करणाऱ्यांना कायद्याची ताकद दाखवू' - एंथोनी अल्बानीस

दरम्यान, 23 मार्च रोजी दरवर्षी पाकिस्तानमध्ये 1940 चा लाहोर( Lahore ) संकल्प साजरा करण्यासाठी सैन्य परेड केला जातो. या लाहोर संकल्पात ब्रिटिश भारतातील मुस्लिमांना स्वतंत्र देशनिर्मितीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

हा दिवस साजरा करण्यासाठी तसेच पाकिस्तानी सैन्य शक्तींचे प्रदर्शन आणि विविध कला गुण संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी पाकिस्तान( Pakistan )मधील इस्लामाबादच्या शकरपेरियन मैदानावर पाकिस्तानचे नागरिक एकत्र येतात.

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी लाहोर दिनादिवशी साजरा करण्यात येणाऱ्या कार्यक्रमातील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com