Dubai hotel live stream explosion  Dainik Gomantak
ग्लोबल

Missile Attack: लाईव्ह व्हिडिओत कोसळलं 'मिसाईल'! दुबईतलं धडकी भरवणारं फुटेज व्हायरल; महिलेचा जागीच मृत्यू Watch Video

Dubai missile attack viral video: जागतिक पातळीवर वाढत चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sameer Panditrao

जागतिक पातळीवर वाढत चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच दुबईत घडल्याचा दावा करण्यात येत असलेल्या एका घटनेने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे नेटीझन्स हादरले असून, या घटनेबाबत विविध दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.

व्हायरल क्लिपमध्ये एक महिला हॉटेलमधील खोलीत बसून लाईव्ह स्ट्रीम करताना दिसते. ती आपल्या प्रेक्षकांशी निवांत संवाद साधत असताना वातावरण पूर्णपणे शांत असल्याचे जाणवते. मात्र काही क्षणांतच परिस्थिती अचानक बदलते. मोठा स्फोट झाल्याचा आवाज येतो आणि कॅमेरा जोरात हलू लागतो.

त्यानंतर स्क्रीनवर धूर आणि गोंधळाचे दृश्य दिसून येते. सोशल मीडियावरील काही पोस्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की ज्या इमारतीत ती महिला उपस्थित होती, त्या परिसरात क्षेपणास्त्र कोसळले. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याचे बोलले जात असून इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा काही युजर्सनी केला आहे.

इतकेच नव्हे तर संबंधित महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याचेही काही जणांनी नमूद केले आहे. हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @Sheetal2242 या हँडलवरून शेअर करण्यात आला असल्याचे सांगितले जाते.

काही तासांतच लाखो व्ह्यूज आणि हजारो प्रतिक्रिया या पोस्टला मिळाल्या. युद्धाच्या पार्श्वभूमीवर निरपराध नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याबद्दल अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला, तर काहींनी या घटनेची सत्यता तपासण्याची मागणी केली. एकूणच, या व्हायरल व्हिडिओने युद्धकाळातील सामान्य नागरिकांची सुरक्षितता आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अप्रमाणित माहितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Political Crisis: सिद्धरामय्या देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा सस्पेन्स वाढला

Shocking: नवऱ्यानचं बायकोचा केला सौदा! 50 हजारांत विकून रचला 'हा' भयानक बनाव; पोलिसांनी 7 नराधमांना ठोकल्या बेड्या

Israel Gaza Surgical Strike: हमासचा नवा लष्कर प्रमुख ठार! इस्रायलची मोठी कारवाई; 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' अखेर ढेर VIDEO

Horoscope 27 May 2026: रखडलेले व्यवहार मार्गी लागणार, नोकरीत मिळणार बढती अन् मोठ्या धनलाभाचा योग; बुधवारचा दिवस 4 राशींसाठी भाग्याचा!

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

SCROLL FOR NEXT