VIDEO: "मी रात्रभर झोपले नाही..." बॉलिवूड अभिनेत्रीला 'ती' प्रतिक्रिया पडली महागात! खामेनींच्या मृत्यूनंतर नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

Farhana Bhatt On Ayatollah Ali Khamenei Khamenei: एका अभिनेत्रीने खामेनेई यांच्या निधनावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वादाचा केंद्रबिंदू ठरली.
Ayatollah Ali Khamenei Khamenei Death
Farhana Bhatt On Ayatollah Ali Khamenei KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Ayatollah Ali Khamenei Khamenei Death: इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाची बातमी समोर आली. या घटनेचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत असतानाच भारतातही याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. विशेषतः चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने खामेनेई यांच्या निधनावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वादाचा केंद्रबिंदू ठरली. 'बिग बॉस 19' ची स्पर्धक आणि प्रसिद्ध अभिनेत्री फरहाना भट्ट हिने खामेनेई यांच्या निधनावर शोक व्यक्त केल्याने इंटरनेटवर मोठा गदारोळ माजला.

इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये फरहाना भट्टला खामेनेई यांच्या निधनाबद्दल विचारण्यात आले होते. यावर अत्यंत भावूक होत फरहानाने म्हटले की, "ते असे व्यक्तिमत्व होते ज्यांना कधीही विसरता येणार नाही. ते नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील. अल्लाह त्यांची शहादत कबूल करो, अशी मी प्रार्थना करते." इतकेच नव्हे तर तिने काश्मीरमधील लोकांच्या भावनांचाही उल्लेख केला. "काश्मीरमधील लोक सध्या मोठ्या दु:खात आहेत, प्रत्येकाचे हृदय तुटले आहे," असे सांगत तिने खामेनेई यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त केला.

Ayatollah Ali Khamenei Khamenei Death
US-Israel Attacks Iran: अमेरिका- इस्रायलचा इराणवर हल्ला! 148 मुलींचा मूत्यू, सगळीकडे रक्ताचा सडा Watch Video

फरहानाने आपल्या प्रतिक्रियेत पुढे धक्कादायक अनुभव सांगताना म्हटले की, "तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सेहरीनंतर मी एक क्षणही झोपू शकले नाही. नमाज पडताना माझे मन खूप जड झाले होते. असे व्हायला नको होते. अनेक लोकांसाठी ते एखाद्या मसिहापेक्षा कमी नव्हते. ते नेहमीच आमच्या स्मरणात राहतील." फरहानाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले. तिच्या या विधानामुळे सोशल मीडिया दोन गटात विभागला गेला असून एका गटाने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ट्रोलर्संनी फरहानाला अत्यंत कठोर शब्दात सुनावले. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "आमच्या देशात प्रत्येक प्रकारचे वेडे लोक राहतात." तर दुसऱ्या एका युजरने 'बिग बॉस 19' चा संदर्भ देत म्हटले, "बरं झालं बिग बॉस 19 चं विजेतेपद गौरव खन्नाने जिंकलं, तुझ्यासारख्या विचारांच्या व्यक्तीने नाही."

Ayatollah Ali Khamenei Khamenei Death
US, Israel Attack Iran: मध्यपूर्वेतील तणावाचा विमानसेवेला फटका! गोव्याहून दुबई आणि बहरीनला जाणारी विमानं रद्द

तर काही युजर्संनी तिला धार्मिकतेवरुन विचारले की, "जर तुला त्या व्यक्तीबद्दल इतकाच आदर आहे, तर तू स्वतः बुर्का का घालत नाहीस?" तर काहींनी तिला थेट "कृपया इराणला निघून जा" असा सल्ला दिला. भारतासारख्या (India) लोकशाही देशात राहून इराणच्या नेत्याचे समर्थन करणे अनेकांना रुचलेले नाही. या प्रकरणावरुन आता मनोरंजन विश्वात आणि राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरु झाली असून फरहाना भट्टच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com