Chasa Sun Dainik Gomantak
ग्लोबल

Driving Licence साठी 959 वेळा टेस्ट.. 18 वर्षे मेहनत.. लाखोंचा खर्च, वयाच्या 69 व्या वर्षी महिलेला मिळाला परवाना

959 Attempt: एखाद्या देशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचा नियम इतका अवघड आहे की, एखाद्या महिलेला 18 वर्षे वाट पाहावी लागली तर नवलच.

Manish Jadhav

Attempts Of Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचे नियम वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे आहेत. जुगाड करुन लोक ड्रायव्हिंग लायसन्स मिळवतात, परंतु असे अनेक ठिकाणी घडत असले तरी नंतर मात्र त्याचा फटका त्यांनाच सहन करावा लागतो.

पण विचार करा, एखाद्या देशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचा नियम इतका कठीण आहे की, एखाद्या महिलेला 18 वर्षे वाट पाहावी लागली तर नवलच. ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत 959 वेळा नापास झालेली एक महिला समोर आली आहे.

2005 मध्ये पहिल्यांदा टेस्ट दिली

वास्तविक, चासा सून असे या महिलेचे नाव असून ती दक्षिण कोरियाची (South Korea) आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेने 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 मध्ये पहिल्यांदा टेस्ट दिली होती.

यात अपयश आल्यानंतरही तिने हार मानली नाही आणि ही प्रक्रिया सुरु झाली. तिने आठवड्यातून दोनदा लेखी परीक्षा देण्यास सुरुवात केली. यात उत्तीर्ण झाल्यावर ती प्रॅक्टिकल टेस्ट देत.

959 वेळा टेस्ट द्यावी लागली

यानंतर, तिने 10 प्रयत्नांनंतर ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण केली. एकूण 960 वेळा तिला टेस्ट द्यावी लागली. आणि आता तिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे.

आता ती 69 वर्षांची आहे, जेव्हा तिला गाडी चालवण्याची सरकारी परवानगी मिळाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 18 वर्षांच्या या मेहनतीमध्ये या महिलेने (Woman) 11 लाखांहून अधिक रुपये खर्च केले.

कंपनीने कार भेट दिली

एका रिपोर्टनुसार, 18 वर्षांपूर्वी महिलेला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी लॉरी चालवावी लागत होती, त्यामुळे तिने परवान्यासाठी अर्ज केला होता.

आता या महिलेची कहाणी जगभर व्हायरल झाली, असताना एका कार निर्मात्याने तिला मदत करण्यासाठी कार गिफ्ट केली आहे. या क्षणी या महिलेला अखेर परवाना मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT