Worlds Largets Graveyard: 'या' देशात आहे जगातील सर्वात मोठे कब्रस्तान, जिथे दफन केले जातात करोडो मृतदेह

Biggest Muslim Graveyard In The World: या कब्रस्तानात कोट्यवधी मृतदेह दफन केले जातात आणि त्याचा इतिहास 100-200 वर्षांचा नसून 1400 वर्षांचा आहे.
Wadi US Salaam
Wadi US SalaamDainik Gomantak

Largest Grave In The World: अंत्यसंस्काराबाबत सर्व धर्मांच्या आपापल्या प्रथा आहेत. हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात आणि ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात ते स्मशानभूमी म्हणून ओळखले जाते.

मुस्लिम (Muslim) आणि ख्रिश्चन धर्मात मृतदेह पुरण्याची परंपरा आहे. आपल्याला माहीत आहे की, ज्या ठिकाणी मृतदेह पुरले जातात त्या जागेला 'कब्रस्तान' म्हणतात. जवळपास प्रत्येक शहरात आणि गावात कब्रस्तान आहेत.

येथे आम्ही अशाच एका कब्रस्तानाबद्दल बोलत आहोत, जे जगातील सर्वात मोठे कब्रस्तान आहे. या कब्रस्तानात कोट्यवधी मृतदेह दफन केले जातात आणि त्याचा इतिहास 100-200 वर्षांचा नसून 1400 वर्षांचा आहे.

जगातील सर्वात मोठे कब्रस्तान कोठे आहे?

इराकमध्ये (Iraq) जगातील सर्वात मोठे कब्रस्तान आहे, ज्याचे नाव 'वादी-अल-सलाम' आहे. इराकमधील नफाज शहरात हे कब्रस्तान आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या कब्रस्तानाने शहराचा सुमारे 20 टक्के भाग व्यापला आहे. इतिहासकार सांगतात की, हे कब्रस्तान आठव्या शतकात बांधले गेले होते.

याचा अर्थ सुमारे 1400 वर्षांपासून लोक येथे मृतदेह दफन करत आहेत. या शहराची स्थापना अली इब्न अबी तालिबचे दरगाह म्हणून करण्यात आली.

Wadi US Salaam
Railway स्टेशनवर नमाजाला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्याला मिळाली शिक्षा, नोकरी...!

1500 एकरात पसरलेले कब्रस्तान

जगातील सर्वात मोठी ‘वादी-अल-सलाम’ कब्रस्तान सुमारे 1500 एकरमध्ये पसरलेले आहे. मुस्लिम धर्मात शिया समुदाय या ठिकाणाला अतिशय पवित्र मानतो. या कब्रस्तानाला जगभरात 'व्हॅली ऑफ पीस' म्हणूनही ओळखले जाते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार येथे करोडो मृतदेह पुरण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com