Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

US France Trade Tariff Dispute: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या आक्रमक धोरणांसाठी आणि खळबळजनक विधानांसाठी ओळखले जातात.

Manish Jadhav

US France Trade Tariff Dispute: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या आक्रमक धोरणांसाठी आणि खळबळजनक विधानांसाठी ओळखले जातात. नुकतेच रिपब्लिकन खासदारांना संबोधित करताना ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची जाहीर थट्टा केली. अमेरिकेतून आयात होणाऱ्या आणि फ्रान्समध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीवरुन ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांना धमकावले होते, ज्यासमोर मॅक्रॉन यांनी गुडघे टेकले, असा दावा ट्रम्प यांनी केला. इतकेच नव्हे तर, "प्लीज हे कोणाला सांगू नका," अशी विनवणी मॅक्रॉन यांनी केल्याचे सांगत ट्रम्प यांनी त्यांची खिल्ली उडवली.

25 टक्के अतिरिक्त कराचा दिला होता इशारा

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, अमेरिका दशकांपासून जागतिक आरोग्य सेवेला सबसिडी देत आहे. अमेरिकन ग्राहक फ्रेंच ग्राहकांच्या तुलनेत प्रिस्क्रिप्शन औषधांसाठी तब्बल 14 पट अधिक पैसे मोजत आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी ट्रम्प यांनी फ्रान्सला थेट इशारा दिला होता. "जर तुम्ही अमेरिकन मागण्या मान्य केल्या नाहीत, तर फ्रान्समधून अमेरिकेत येणाऱ्या शॅम्पेन, वाईन आणि इतर सर्व उत्पादनांवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला जाईल," अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.

"डोनाल्ड, तुम्ही म्हणाल तसं करतो..."

ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, टॅरिफच्या धमकीने मॅक्रॉन इतके घाबरले की त्यांनी तातडीने माघार घेतली. ट्रम्प म्हणाले, "मॅक्रॉन मला म्हणाले, 'डोनाल्ड, मी औषधांच्या किमती 200 टक्क्यांनी किंवा तुम्हाला हव्या तितक्या वाढवतो. पण मी तुम्हाला विनंती करतो की, कृपया ही गोष्ट जनतेला सांगू नका.' केवळ फ्रान्सच नाही, तर इतर प्रत्येक देशाने हीच प्रतिक्रिया दिली."

ट्रम्प यांनी पुढे बोलताना दावा केला की, त्यांच्या या दबावामुळे फ्रान्सने 10 डॉलर प्रति गोळी असलेली औषधांची किंमत 30 डॉलरपर्यंत वाढवली, तर दुसरीकडे अमेरिकेतील औषधांच्या किमती कमी झाल्या. अमेरिकेचे 'मोस्ट फेवर्ड नेशन' धोरण राबवल्यामुळेच ही गोष्ट साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक राजकारणात खळबळ

दुसरीकडे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाबद्दल अशा प्रकारे 'विनवणी' केल्याचे विधान करणे हे मुत्सद्देगिरीच्या विरोधात मानले जाते. ट्रम्प यांनी हे विधान करुन फ्रान्सला जागतिक स्तरावर कमी लेखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्रम्प यांच्या या खळबळजनक वक्तव्यावर अद्याप इमॅन्युएल मॅक्रॉन किंवा फ्रेंच सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणामुळे युरोपीय देशांसोबतचे अमेरिकेचे व्यापारी संबंध पुन्हा एकदा तणावाखाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औषधांच्या किमती आणि टॅरिफचा हा वाद आगामी काळात युरोप आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी युद्धाला तोंड देऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

VIDEO: लाईव्ह सामन्यात कुत्र्याचा धुमाकूळ! चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT