Sameer Panditrao
नौदलाच्या सशक्तीकरणासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक अशी युद्धनौका तयार करण्याची योजना जाहीर केली आहे.
ही युद्धनौका वेगवान, सर्वात मोठी आणि आतापर्यंत बांधलेल्या कोणत्याही युद्धनौकेच्या १०० पट अधिक शक्तिशाली असणार आहे.
या जहाजाची लांबी ८८० फूट लांब असण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी ‘गोल्डन फ्लीट’ अंतर्गत या युद्धनौकेची बांधणी होणार आहे.
ट्रम्प यांनी दिलेली माहितीनुसार, ही युद्धनौका ‘यूएसएस डिफायंट’ या नावाने ओळखली जाईल. ती दुसऱ्या महायुद्धातील आयोवा वर्गाच्या युद्धनौकांपेक्षा अधिक लांब आणि मोठी असेल.
या नौकेवर ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रे, आण्विक क्षेपणास्त्रे, ‘रेलगन्स’ आणि ‘हाय पॉवर लेझर’ असणार आहेत. हे सर्व तंत्रज्ञान सध्या नौदलाकडून विकासाच्या विविध टप्प्यांवर आहे.
अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या युद्धनौका असलेल्या आयोवा-वर्गाच्या नौकांचे वजन अंदाजे ६०,००० टन होते.
अमेरिकने १९८० च्या दशकात चार आयोवा-वर्गीय युद्धनौकांचे आधुनिकीकरण केले; पण १९९० च्या दशकात त्या नौका सेवेतून बाद करण्यात आल्या.
'जिंगल बेल' हे गाणे आधी ख्रिसमससाठी न्हवते