US|Texas Dainik Gomantak
ग्लोबल

US: धक्कादायक! ट्रकमध्ये आढळले तब्बल 42 मृतदेह

Texas: या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील टेक्सास (Texas) राज्याच्या हद्दीत एका ट्रकमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण परप्रांतीय असल्याचे माहिती मिळाली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, किमान 16 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर (Social Media) शेअर होत असलेल्या फोटोंमध्ये अनेक आपत्कालीन कर्मचारी एका मोठ्या ट्रकभोवती दिसत आहेत. एका स्थानिक टीव्ही चॅनलनुसार, ट्रक सॅन अँटोनियोच्या नैऋत्य बाजूला रेल्वे ट्रॅकजवळ दिसला.

न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, सॅन अँटोनियो पोलिस विभागाचे अधिकारी घटनास्थळावरून पळून गेलेल्या वाहन चालकाचा शोध घेत आहेत. सॅन अँटोनियो यूएस-मेक्सिको सीमेपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी या मृत्यूंसाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना जबाबदार धरले आहे.

मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी सांगितले की, त्यांचा एक अधिकारी घटनास्थळी रवाना झाला आहे. मात्र, पीडितांच्या नागरिकत्वाबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT