धक्कादायक! नेपाळी मुलींवर नराधमांनी केला बलात्कार

नेपाळच्या डोंग जिल्ह्यातून मणिपूरच्या आठवडी बाजारात आलेल्या सहा तरुणींचा चार तरुणांनी विनयभंग केला.

Girl
GirlDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळच्या डोंग जिल्ह्यातून मणिपूरच्या आठवडी बाजारात आलेल्या सहा तरुणींचा चार तरुणांनी विनयभंग केला. यानंतर सर्वांना झाडाला बांधून दोन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. घाबरलेल्या मुलींनी घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली आणि डोंग येथील खांगरा नाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरुन नेपाळ पोलिसांनी पीडित मुलींसह हरैय्या सातघरवा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर आज म्हणजेच सोमवारी एसओजीच्या मदतीने पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. एसपी म्हणाले की, 'सर्व आरोपींवर एनएसए लावला जाईल. त्याचबरोबर त्यांच्यावर गॅंगस्टर अंतर्गत कारवाई करण्यात येईल.' (Sexual Assault With Girls From Nepal In Balrampur)

दरम्यान, नेपाळमधील (Nepal) डोंग जिल्ह्यातील खांगरा नाका पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका मुलीने रविवारी रात्री हरैया सतघरवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या सहा मैत्रिणी मणिपूरच्या आठवडी बाजारात हरैया भागातील खरेदीसाठी सायकलवरुन जात होत्या. मात्र वाटेत महादेव बाणकी जंगलाजवळ अगोदरच लपून बसलेल्या चार तरुणांनी त्यांना अडवून विनयभंग करण्यास सुरुवात केली. नंतर या नराधमांनी सर्व मुलींना झाडाला बांधून दोन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. तरुणांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर सर्व मुलींनी आपापल्या घरी पोहोचून कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली.


Girl
नेपाळ विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू

दुसरीकडे, कुटुंबीयांनी मुलींना घेऊन डोंग जिल्ह्यातील खांगरा नाका पोलिस स्टेशन गाठले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून नेपाळ पोलिसांनी पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांसह तात्काळ हरैया सातघरवा पोलीस (Police) ठाण्यात गाठले. जिथे पीडितेच्या तक्रारीवरुन हरैय्या सातघरवा पोलिस स्टेशन हद्दीतील जयरामपूर खादर गावातील रहिवासी रामचंद्र, राजेंद्र, राकेश आणि पिंटू यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com