Dead birds fell from sky In Wales Twitter
ग्लोबल

वेल्समध्ये आकाशातून पडला मृत पक्षांचा पाऊस

वेल्समध्ये, अचानक 200 हून अधिक पक्षी रस्त्यावर मृतावस्थेत आढळले.

दैनिक गोमन्तक

जगभरात अनेक वेळा अशा विचित्र गोष्टी घडतात, ज्याबद्दल जाणून घेऊन प्रत्येकजण थक्क होतो. अशाच एका घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे. वेल्समध्ये (Wales), अचानक 200 हून अधिक पक्षी (Birds) रस्त्यावर मृतावस्थेत आढळले. रस्त्याने गाडीने जाणारे लोकही हे पाहून थक्क झाले. आश्‍चर्याची बाब म्हणजे हा अपघात कसा घडला, हे कोणालाच माहीत नाही. (Dead birds fell from sky In Wales)

डेली स्टारच्या वृत्तानुसार, वेल्समधील पेमब्रोकशायरमधील वॉटरस्टोन ते हेजल बीच दरम्यानच्या रस्त्यावर एक घटना घडली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वेल्समध्ये अनेक मृत पक्षी रस्त्यावर पडलेले आहेत. काही लोकांनी असा दावा केला आहे की जवळच्या ड्रॅगन एलएनजी गॅस कंपनीच्या प्लांटमधून गळती झाल्यामुळे ही घटना घडले असेल, परंतु वेल्स ऑनलाइनच्या अहवालानुसार या तथ्याला लोकांना समर्थन दिले नाही.

मायकेला प्रिचर्ड नावाच्या महिलेने वेल्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, त्या रस्त्यावर पोहोचताच तिने हे दृश्य पाहिले आणि ती लगेच निघून गेली कारण तिला ते दृश्य खूप भितीदायक वाटले. दुसरीकडे इयान मॅकॅफ्रे नावाच्या व्यक्तीने सांगितले की, त्याने मोठा आवाज ऐकला आणि त्यानंतर आकाशातून पक्षी पडू लागले. तो आवाज विजेसारखा मोठा नसून सामान्यच होता, मात्र आवाज झाल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या गाडीच्या बोनेटवर 5 पक्षी पडले आणि 6 पक्षी जमिनीवर पडले.

घटना स्थळाजवळ राहणाऱ्या क्ले ईटन नावाच्या महिलेने सांगितले की, ती रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जात असताना तिला अचानक मोठा आवाज आला. तिच्यासोबत असलेल्या कुत्र्याने एक मृतावस्थेतील पक्षी घरी आणला आणि तिया या घटनेचा अंदाज आला.

या सर्व प्रतिक्रिया येत असल्या तरी वास्तविक काय घडले ते अद्याप कुणालाही कळले नाही. मात्र या आश्‍चर्याची बाब म्हणजे हा अपघात कसा घडला हे कोणालाच माहीत नाही. मात्र या घटनेने आजूबाजूच्या परिसरात पक्षांबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT