Muslim Students
Muslim StudentsDainik Gomantak

हिजाबवरील अमेरिकेच्या वक्तव्यावर भारतानं दिली कठोर प्रतिक्रीया

परदेशात धार्मिक स्वातंत्र्यावर देखरेख आणि अहवाल देणारी अमेरिकन सरकारी संस्था इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (IRF) ने कॉलेज कॅम्पसमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याची मागणी केली आहे.
Published on

कर्नाटकात हिजाबचा वाद वाढत आहे. हिजाबच्या वादावर जागतिक गदारोळ सुरु असताना, भारताने स्पष्टपणे म्हटले की, अंतर्गत मुद्द्यांवर प्रेरित टिप्पण्या स्वीकार्य नाहीत. परदेशात धार्मिक स्वातंत्र्यावर देखरेख आणि अहवाल देणारी अमेरिकन सरकारी संस्था इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (IRF) ने कॉलेज कॅम्पसमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याची मागणी केली आहे. (Karnataka Hijab Row) या वादाच्या पार्श्वभूमीवर देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (India Reacts Harshly To US Statement On Hijab)

कर्नाटक (Karnataka) वादाचा संदर्भ देत आयआरएफचे राजदूत रशाद हुसैन यांनी ट्विट करत म्हटले, "शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालणे हे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे." रशाद हुसैन यांच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटलयं की, "धार्मिक स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकांना धार्मिक पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. कर्नाटक राज्याने कोणत्या प्रकारचा धार्मिक पोशाख परिधान करावा ते ठरवू नये. शाळांमध्ये हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करते. आणि यामुळे महिला आणि मुलींना कलंकित आणि दुर्लक्षित केले जात आहे." जगभरातील धार्मिक संस्थाचे हुसेन राजदूत आहेत.

Muslim Students
Karnataka Hijab Row: आज मालेगाव आणि जयपूरमध्ये हिजाब मोर्चा

दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यात फ्लॅग मार्च काढण्यात आला. पोलिस उपायुक्त हरिराम शंकर यांनी सांगितले की, 'शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर आणि सुरतकलमध्ये फ्लॅग मार्च काढण्यात आला.'

तसेच, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) च्या 97 व्या बटालियनमध्ये 130 जवान आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरएएफ कर्मचारी कारवाई करतील, असंही शंकर म्हणाले. हिजाबच्या वादाचे केंद्रस्थान असलेल्या उडुपीमधील कौप, कुंदापूर, करकला, पदुबिदरी, ब्रह्मावर, बांदूर आणि शिरवामध्ये पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com