Viral Crocodile Attack Video: काही लोक इतके उत्साहाने भरलेले असतात की कधीकधी हाच उत्साह त्यांच्या जीवावर बेतू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, जेव्हा त्या व्यक्तीने उत्साहाच्या भरात मगरीची शेपटी पकडली तेव्हा त्याने मृत्यूलाच आमंत्रण दिले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खूप भयानक आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हीही थरथर कापाल.
दरम्यान, हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडिया (Social Midea) प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @therealtarzann नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, तो लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला. व्हिडिओमध्ये एक तलाव दिसतो, जिथे एक मगर विश्रांती घेत आहे. त्याचवेळी एक माणूस विश्रांती घेत असलेल्या या मगरीजवळ जातो आणि तिची शेपटी उचलून घेऊ लागतो. पण पुढच्याच क्षणी मगर वेगाने मागे वळून त्या माणसावर जोरदार हल्ला करते. तो माणूस त्या मगरीच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावतो आणि लगेचच मगरीपासून दूर जातो. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक भीतीने ओरडू लागतात.
व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट केली की, "असे दिसते की त्याला त्याच्या आयुष्यात रस कमी झाला आहे." दुसऱ्याने लिहिले की, "भावाचे धाडस पाहा, त्याने मगरीला आव्हान दिले." तर तिसऱ्याने लिहिले की, "सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करत नाहीत, मगरीसारख्या धोकादायक प्राण्याशी विनोद करणे घातक ठरु शकते."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.