Goa CM Pramod Sawant  Viral Video
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

Viral Video: मुख्यमंत्र्यांची अचानक माशेलातील शाळेला भेट, मुलांसोबत घेतला इडली नाष्ट्याचा आस्वाद; व्हिडिओ व्हायरल!

Goa CM Pramod Sawant Viral Video: सध्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा एक खास व्हिडिओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.
Published on

Goa CM Pramod Sawant Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र सध्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा एक खास व्हिडिओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सावंत माशेल येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर बेंचवर बसून इडलीचा नाष्टा घेतानाचे दृश्य पाहायला मिळते. त्यांच्या साधेपणाच्या आणि लोभस वर्तनाच्या या क्षणाचे अनेकजण कौतुक करत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा

मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मंगळवारी (24 जून) माशेलमधील एका शाळेला अचानक भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता दिलेल्या या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील वातावरण पाहून त्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणीही विद्यार्थ्यांबरोबर शेअर केल्या. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत इडलीचा नाष्टा घेऊन त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

Goa CM Pramod Sawant  Viral Video
Viral Video: "अरे उलटी उडी मार आणि सेलिब्रेट कर", पंतच्या शतकावर गावसकर फिदा, सेलिब्रेशनचा दिला सल्ला

दरम्यान, या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या (Student) अडचणी, अभ्यासक्रम आणि त्यांच्या शालेय गरजांबाबत माहिती घेतली. मुख्यमंत्री सावंत यांच्या अशा सहज आणि सुसंवादी शैलीचे अनेकदा सोशल मीडियावर कौतुक होत आले आहे. या व्हिडिओमधूनही त्यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या आत्मीयतेची झलक पाहायला मिळते.

Goa CM Pramod Sawant  Viral Video
Viral Video: "होमवर्क जमणार नाही, आम्हाला मारा पण मुलाचे मार्क कापू नका" अभ्यासाला कंटाळून वडिलांनी जोडले हात

मुख्यमंत्र्यांचे वेळोवेळी अशा शाळा, हॉस्पिटल किंवा स्थानिक प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या अचानक भेटी हे त्यांच्या कार्यशैलीचे विशेष वैशिष्ट्य राहिले आहे. या व्हिडिओनंतर अनेक नेटिझन्स आणि राजकीय विश्लेषकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या या सहभागाचे स्वागत केले आहे. हा व्हिडिओ सध्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com